शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

मलठण प्रकल्पातील जनावरांचे अखेर स्थलांतर

By admin | Updated: June 24, 2016 02:01 IST

चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असल्याने न्यायालयाच्या ओशानुसार मलठण (ता. दौंड) येथील समृद्ध जीवन प्रकल्पातील जनावरे भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टकडे स्थलांतरित करण्यात आली

राजेगाव : चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असल्याने न्यायालयाच्या ओशानुसार मलठण (ता. दौंड) येथील समृद्ध जीवन प्रकल्पातील जनावरे भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टकडे स्थलांतरित करण्यात आली. नऊ ट्रकमधून मोठ्या १०४ व लहान ३ गाई, अशा एकूण १०७ गार्इंचा समावेश आहे. दरम्यान, प्रकल्पात आजअखेर १६७ म्हशी, २५ संकरित गाई आणि १३ गावरान गाई शिल्लक आहेत. ही जनावरेदेखील शुक्रवारी (दि. २४) स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांनी दिली. येथील सर्व जनावरांचे संगोपन करण्याचा निर्णय भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टने घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी पृथ्वीराज ऊर्फ बाबूशेठ बोथरा आणि मॅनेजिंग ट्रस्टी ओमप्रकाश राका यांनी दिली. जनावरांची हेंडसाळ होत आहे, हे वेळीच आमच्या लक्षात आले असते, तर एकही जनावर दगावले नसते; परंतु सध्याची परिस्थिती पाहता मलठण (ता. दौंड) येथे जनावरांसाठी ३० हजारांचा चारा पाठविला असल्याचे पृथ्वीराज बोथरा यांनी स्पष्ट केले.मलठण (ता. दौंड) येथील जनावरांची परिस्थिती पाहता लाडली गोशाळेचे आणि जगदंब ग्रुपचे प्रमुख निखिल स्वामी, अमित कदम, अमोल जगदाळे, रूपेश बंड, अविनाश जगदाळे, अक्षय अंकुश, अनिकेत बहिरमल, पांडुरंग मेरगळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. दरम्यान, जगदंब ग्रुपच्या वतीने ४ टन चारा देण्यात आला. तसेच, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खटी, सुरेंद्र बलदोटा, मोहन नारंग, अक्षय बुलाणी, सुनील व्हंकाडे यांनी ११ हजार ५०० रुपयांचा चारा दिला. तसेच, पुणे येथील उद्योगपती किशोर निम्हण यांनी २ टन चारा दिला. आज दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली संपूर्ण दौंड तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाने स्थलांतर कामात मोठी मेहनत घेतली. शिवाय, या विभागातील सर्व कमर्चारी व डॉक्टर यांनी वर्गणी गोळा करून चारावाहतुकीचा खर्च दिला, तर खानवटे येथून हनुमंत कन्हेरकर यांनी ५ गुंठे हिरवा चारा मोफत दिला.