लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील ५४ व आगामी काळात निवडणूक होणाऱ्या ३४ अशा एकूण ८८ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली. यामध्ये तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींवर महिलांना संधी मिळाली असून नागरिकांचा मागास प्रवर्गाबरोबर सर्वसाधारण प्रवर्गाातही महिला व पुरुष दोघांनाही संधी असल्यामुळे हवेलीमध्ये महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, अनुुुसुूचित जाती व जमातीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेेेवण्यात आले आहे.
प्रवर्गानुसार आरक्षण व गावांची नावे पुढीलप्रमाणे:
सर्वसाधारण प्रवर्ग : लोणी काळभोर, उरुळी कांचन, मनेरवाडी, रहाटवडे, शिवापूर, वडगाव शिंदे, आंबी, भवरापूर, जांभळी, केसनंद, कोरेगाव मूळ, मांजरी खुर्द, मांडवी बु, नायगाव, पेठ, प्रयागधाम, शिंदेवाडी, सांगवी सांडस, तरडे, वढू खु, वळती, फुलगाव, वाघोली, नांदेड
सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) : सोरतापवाडी, शिंदवने, शेवाळेवाडी, वडाची वाडी, पिसोळी, कल्याण, मांगडेवाडी, गोगलवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, बिवरी, भावडी, गोऱ्हे बु, कोंढणपूर, पिंपरी सांडस, आहिरे, खामगाव मावळ, वाडे-बोल्हाई, किरकटवाडी ,कोंढवे धावडे, न्यू कोपरे ,खडकवासला, मांजरी बु, नऱ्हे
नागरिकांचा मागास प्रवर्ग: होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, आर्वी, गाउडदरा, खेड शिवापूर, श्रीरामनगर, हिंगणगाव, खडकवाडी, न्हावी सांडस, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी साष्टे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): मालखेड, आष्टापूर, बहुली, गोऱ्हे खुर्द, शिरसवाडी, सोनापूर, बुर्केगाव, पेरणे, नांदोशी, डोणजे, निरगुडी, लोणी कंद,
अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला): खानापूर, मांडवी खुर्द, आगळंबे, डोंगरगांव, तुळापूर, कुडजे व बकोरी.
* अनुसुचित जाती प्रवर्ग - वडकी, कुंजीरवाडी, वरदाडे, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबाची, जांभूळवाडी - कोळेवाडी व सांगरूण.
अनुसूचित जमाती प्रवर्ग (महिला): खामगाव टेक.
अनुसूचित जमाती प्रवर्ग: घेरासिंहगड.