Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:09 PM2019-10-15T15:09:19+5:302019-10-15T15:11:25+5:30

Pune Vidhan Sabha Election 2019 :काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला

Maharashtra Election 2019 : BJP's mega incoming in Pune no stops doing anything; sunny nimhan enters in BJP | Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

googlenewsNext

पुणे : विधानसभा निवडण़ुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह पुण्यातील मेगाभरती काही केल्या काही थांबायचे नाव घेईना.काही तासांपूर्वी वडगाव शेरीचे मतदारसंघातले राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे समर्थकांसह भाजपच्या गोटात दाखल झाले.  आता पुण्यातील शिवसेनेचे नेते सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी निम्हण यांच्यासह माजी नगरसेवक विनोद ओरसे  विभाग प्रमुख राहुल शिरोळे, अमित मुरकुटे, संजय निम्हण,अनिकेत कपोते,उपविभागप्रमुख प्रवीण जेधे, हेमंत डाबी,रमेश जुनवने,टिंकू दास,हेमंत कांबळे, अमित रणपिसे, महिला आघाडीच्या प्राजक्ता गायकवाड, पौर्णिमा बहिरट, वनमाला कांबळे, सोनिया मुंढे यांच्या शेकडो कार्यकतेर्नी मुबंईतील रंगशारदा येथे भाजपा प्रवेश झाला.
शिवाजीनगरमध्ये मेगाभरती 
काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.मागील आठवड्यात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील कॉग्रेस चे माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विमानतळवर काँग्रेसचे माजी उपमहापौर अलगुडे व इतरानी प्रवेश केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांच्या सभेत माजी महापौर दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकत्यार्नी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ,

Web Title: Maharashtra Election 2019 : BJP's mega incoming in Pune no stops doing anything; sunny nimhan enters in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.