शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

नादुरुस्त बसमुळे वाहतुकीला खो

By admin | Updated: August 7, 2015 00:31 IST

शहरातील रस्ते वाहनांनी दुथडी भरून वाहत आहेत, वाहतूककोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या वाहतूककोंडीने

पुणे : शहरातील रस्ते वाहनांनी दुथडी भरून वाहत आहेत, वाहतूककोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या वाहतूककोंडीने वाहनचालक जेरीस आलेले असताना नादुरुस्त पीएमपीएमएल बसेस रस्त्यामध्येच बंद पडल्यामुळे वाहतुकीची अक्षरश: ‘वाट’ लागते आहे. जानेवारी महिन्यात रस्त्यामध्ये पीएमपी बस बंद पडल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच रस्ता बदलावा लागला होता. पीएमपी प्रशासनाला याबाबत वाहतूक पोलिसांनी पत्र दिल्यानंतर सुधारणेचे दिलेले आश्वासन मात्र केव्हाच हवेत विरले असून, गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३८० वेळा बस बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी झाल्याची आकडेवारी आहे.दोन दिवसांपूर्वी बाजीराव रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर बस बंद पडल्या, की या रस्त्यांवरची वाहतूक मंदावते. पीएमपी बसचा आकार आणि रस्त्यांची रुंदी यामुळे अन्य वाहनांना जायला जागाच शिल्लक राहत नाही. मध्यवर्ती पेठांमधील गर्दीच्या आणि बाजाराच्या रस्त्यांवरही बसेस बंद पडण्याचे प्रकार सतत सुरू असतात. यासोबतच पीएमपीचे चालक बसथांब्यांवर बसेस व्यवस्थित उभ्या करत नाहीत. रस्त्याच्या कडेला सरळ रेषेमध्ये बस उभ्या करण्याचे तर जणू प्रशिक्षणच या चालकांना देण्यात आले आहे, की नाही असा विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती आहे. महापालिकेसमोरच्या शिवाजी पुलाच्या दोन्ही बाजूला नेमकी हिच परिस्थिती पहायला मिळते. वेड्या वाकड्या आणि बेदरकारपणे उभ्या करण्यात आलेल्या पीएमपी बसमुळे वाहतूककोंडी तर होतेच, परंतु अनेकवेळा अपघातही होण्याची शक्यता असते. जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक सिग्नल बसल्याच्या घटनेला बुधवारी १०१ वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील ‘हाऊस आॅफ पार्लमेंट’ समोरच्या चौकात हा सिग्नल बसवण्यात आला होता. मात्र, या ऐतिहासिक दिवशी शहरातील ६ महत्त्वाचे सिग्नल बंद असल्याचे समोर आले. सहा महिन्यांत विजेअभावी, तांत्रिक अडचणींमुळे ४५१ वेळा सिग्नल बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी वाढत गेली आहे. सदोष सिग्नल यंत्रांमुळे अनेकदा सुरळीत वाहतूक बिघडते. वाहतूक पोलीस या सिग्नलची दुरुस्ती करतात. मध्यंतरी काही आयटी कंपन्यांनी सोलर पॅनल बसवून त्याद्वारे सिग्नल सुरू ठेवण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलीस आणि पालिकेला दिला होता. वाहतूक पोलिसांनी या प्रस्तावाला तोंडी मान्यता दिली. परंतु, पालिकेमध्ये जाऊन हा प्रस्ताव मागे पडला. पीएमपीच्या मालकीची बस रस्त्यावर बंद पडल्यानंतर चालक तातडीने वायरलेस विभागाशी संपर्क साधतो. त्यानुसार ब्रेकडाउन व्हॅन घटनेच्या ठिकाणी पाठविली जाते. त्याचठिकाणी बस लगेच दुरुस्त होत नसेल, तर ती आगारामध्ये आणली जाते. त्यासाठी जास्तीत जास्त एक तासाचा कालावधी पुरेसा असतो. पण, ठेकेदारांकडील बंद बस दुरुस्त करण्याची जबाबदारी पीएमपीची नाही. त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते. अनेकवेळा ठेकेदारांकडील बस लवकर दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली.सिग्नल व्यवस्था निर्दोष आणि सुरळीत चालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. वाहतूक पोलीस ही वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा असली, तरी त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी अन्य यंत्रणांची मदत घ्यावी लागते. सिग्नल व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्याला बॅकअप असणे आवश्यक आहे. रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपी बस तातडीने हटविल्या पाहिजेत. वाहतूककोंडी दूर करणे ही वाहतूक पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही जबाबदारी आहे.- सारंग आवाड (उपायुक्त, शहर वाहतूक पोलीस)