पुणे : महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचा सोमवारी (दि. २३) द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘स्वरज्योती’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या भक्तिरसपर गीतांना अमर ओक यांच्या बासरीवादनाचा साज चढणार आहे. मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्योत्स्ना दर्डा यांचे निधन झाले. मात्र, सखी मंचच्या राज्यातील हजारो सदस्यांच्या मनात त्यांच्या विचारांची ज्योत तेवत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सखी मंच सदस्यांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)४ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना झाली. सखी मंचच्या राज्यात दीड लाखाहून अधिक सभासद असून, देशातील महिलांसाठी असणारे हे सर्वाधिक मोठे व्यासपीठ आहे.
ज्योत्स्ना दर्डा यांना आज ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली
By admin | Updated: March 23, 2015 00:53 IST