शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृती अखंड व शाश्वत

By admin | Updated: June 3, 2017 02:50 IST

ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन प्रवाह कायम सुरूच आहे. यात सातत्याने नवीन भर पडत आहे. म्हणूनच संस्कृती आजवर टिकली आणि यापुढेही टिकेल. भारतीय संस्कृती अखंड आणि शाश्वत आहे, असे ठोस प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.प्रसाद प्रकाशन व प्रसाद ज्ञानपीठातर्फे पं. वसंतराव गाडगीळ यांना बापूसाहेब जोशी स्मृतिगौरव पुरस्कार, तर व्यवस्थापनतज्ज्ञ प्र. चिं. शेजवलकर यांना मंजिरी जोशी स्मृतिगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद, समर्थ साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ११ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.देगलूरकर म्हणाले, ‘काळाच्या ओघात अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र, आसेतुहिमाचल हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतीची वैचारिक संपत्ती, ध्येय, प्रबोधनात्मक लेखन, प्राचीन साहित्याचा परिचय करून घेण्याचे आणि संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहेत. प्राचीन ज्ञान कधीही लुप्त होत नसते. ते कायम घासून पुसून उजळून लख्ख करायचे असते.’पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘भारतातील संस्कृत भाषा टिकवण्यासाठी मी जीवन समर्पित केले आहे. भारतीयांच्या मनात संस्कृत भाषेला ठोस स्थान मिळायला हवे. मानवी विचारांचा पहिला आविष्कार ॠग्वेद संस्कृतमध्येच उपलब्ध आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी, भाषासम्राज्ञी आहे. ही भाषा कधीही लोप पावणार नाही. अखंड भारतासाठी आपणा सर्वांचे विचार, ध्येय एकच असले पाहिजे.’शेजवलकर म्हणाले, ‘आध्यात्मिक, धार्मिक लेखनातून भारताच्या परंपरेची झलक पाहायला मिळते. ललितगद्य प्रकार वाचकांना आजही आवडतो. आज आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचे वेड लागले आहे. मात्र, जुने ते सोने याचा विचार करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’या वेळी स्वामी भौमानंद आणि सुनील चिंचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. उमा बोडस यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा बोडस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश भागवत यांनी आभार मानले.प्रबंधासाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यकविद्यापीठातील पीएचडी यंत्रणा कशा प्रकारे काम करते, याकडे लक्ष वेधत देगलूरकर म्हणाले, ‘बऱ्याच प्रबंधांमध्ये चौर्यकर्म मोठ्या प्रमाणात चालते. दर्जेदार संशोधन आणि प्रबंधांसाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यक असते.’ वाचक कमी झाल्याने अनेक दर्जेदार मासिके बंद पडली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.