विजेते संघ :खुला गट - साई भजनी मंडळ सासवड, संत काशीनाथ महाराज ट्रस्ट जेजुरी, श्रीनाथ भजनी मंडळ लपतळवाडी, सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव, कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव.
बाल गट - पारेश्वर बाल भजनी मंडळ पारगाव, सुर संगम बाल भजनी मंडळ कुंभारवळण, वाघेश्वर बाल भजनी मंडळ वाघापूर, भोलेनाथ बाल भजनी मंडळ चौधरवाडी, ज्ञानराज बाल भजनी मंडळ दौंडज.
नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सोपानकाका बँकेचे उपाध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, बाजार समितीचे नंदकुमार जगताप, प्रदीप पोमण, अंकुशराव जगताप, संजय आंबेकर, सोपानदेव ट्रस्टचे त्रिगुण गोसावी, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप, नगरसेवक अजित जगताप, वसुधा आनंदे, बाळासो पायगुडे तसेच प्रकाश पवार, शरद जगताप, अनिल उरवणे, सतिश शिंदे, सुधाकर गिरमे, चंद्रशेखर जगताप, संदिप जगताप यांच्या हस्ते दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे ११, ९, ७, ५ आणि ३ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र तसेच सहभागी संघांना ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी देण्यात आली.
या स्पर्धेत ऐंशी भजनी मंडळांनी सहभाग घेतला. संगीताचार्य अरुण कोठावळे व विनायक गुरव यांनी परीक्षण केले. निवेदक महेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बोपगाव भजनी मंडळाचे हभप दत्तात्रय फडतरे, बाळासो फडतरे, सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप, सदस्य राजेंद्र जगताप, संजय काटकर, नंदकुमार दिवसे, सागर घाटगे, चिन्मय निरगुडे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सासवड येथील भजन स्पर्धेतील विजेत्या साई मंडळाला बक्षीस वितरणप्रसंगी मान्यवर