शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

घरच्या घरी जिरविला ओला कचरा

By admin | Updated: January 23, 2015 00:14 IST

ओला कचरा घरच्या घरी जिरविण्याची अत्यंत सोपी ‘बॅक्शन कंपोस्टिंग ड्रम प्रोसेस’ पद्धत दोन तरुणांनी विकसित केली आहे.

दीपक जाधव ल्ल पुणेशहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला असताना ओला कचरा घरच्या घरी जिरविण्याची अत्यंत सोपी ‘बॅक्शन कंपोस्टिंग ड्रम प्रोसेस’ पद्धत दोन तरुणांनी विकसित केली आहे. एका छोट्या ड्रममध्ये कचरा जिरवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात त्यांना यश आले आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रयोगाची पाहणी केली असून, सोसायट्यांसाठी पुढील काळात ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औंध येथील ब्रेमन चौकात क्षेत्रीय कार्यालयाजवळ त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये एमएस्सी केलेल्या निखिल गणोरकर व प्रतीक काटेकर या दोघा तरुणांनी त्याकरिता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कचरा शहरामध्येच जिरविण्याचे आव्हान पुणेकरांसमोर उभे आहे. कचरा जिरविण्यासाठी पालिका अनेक पर्यायांचा विचार करीत असली तरी नागरिकांनी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा तरी आपल्या प्रभागात जिरविण्याची आवश्यकता आहे. सोसायट्यांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरातून सूटही देण्यात आली आहे. मात्र, बहुसंख्य सोसायट्यांनी उभारलेले गांडूळखत प्रकल्प बंद पडले आहेत. यामागील कारणांचा अभ्यास करून एका ड्रममध्ये कचरा जिरविण्याची नवी मायक्रो बायोलॉजिकल प्रोसेस गणोरकर व काटेकर यांनी विकसित केली आहे.अशी आहे नवीन पद्धत४शंभर किलो कचरा साठविण्याची क्षमता असलेल्या ड्रममध्ये कचरा टाकायचा.४त्यामध्ये बॅक्टेरियल क्लचर पावडर टाकली जाते.४ड्रम गोल फिरवून दोन्ही मिश्रण एकच केले जाते.४साधारण १५ दिवसांनी त्यापासून ५० किलो खत तयार होईल.४ड्रम देणाऱ्या संस्थेकडूनच ते खत विकत घेतले जाणार आहे.गांडूळखत प्रकल्पातील त्रुटींचे निराकरणगांडूळखत प्रकल्पामध्ये विशिष्टच ओला कचरा असणे आवश्यक असते. मसालेदार पदार्थ, दूध असे पदार्थ ओल्या कचऱ्यामध्ये आल्यास खतनिर्मिती होऊ शकत नव्हती. तसेच हा प्रकल्प सोसायटीमध्ये उभारण्यास जागेची आवश्यकता असते आणि त्याला खर्चही मोठा येतो. मात्र, नवीन पद्धतीमध्ये सर्व प्रकारचा कचरा जिरविला जाऊ शकतो. त्याचा ड्रम पोर्टेबल असल्याने तो पार्किंग, टेरेस असा कुठेही ठेवता येतो. त्यातून कोणतीही दुर्गंधी येत नाही. तसेच त्याच्या देखभालीसाठी नाममात्र खर्च येतो.