पुणे : पुणे परगण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीचा भाग म्हणजे शिवरायांचे बारा मावळे. या बारा मावळांपैकी पुण्याच्या नैर्ऋत्येकडील मावळ हे कर्यात मावळ आणि या कर्यात मावळातील धायरीगाव. शिवाजीराजांनी धायरी गावाच्या अंबाईची स्थापना केली व धायरीगाव वसवले.सिंहगडाच्या ईशान्येला व पुण्याच्या नैर्ऋत्येला मध्यावर धायरी आहे. महाराजांनी अनेक गड निजामाच्या ताब्यातून घेतले आणि त्या गडांच्या परिसरातील गावे स्वराज्यात घेतली व काही नवीन गावे वसविली, त्यातीलच धायरी हे एक गाव. धायरी गावाचा परिसर ज्या वेळी निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आताच्या धायरी गावातील पांडुरंगाच्या मंदिराजवळ मुस्लिमांची वस्ती होती. त्या वेळी या वस्तीला धायटी असे म्हणत, कारण पूर्वी गावांना झाडे व प्राणी यांच्यावरून नावे देत. वडगाव, आंबेगाव, जांभुळवाडी, पिंपरी, चिंचवड तसेच वाघदरा, मोगरवाडी, गाऊडदरा आदी. धायरी परिसरात धायटीची झाडी भरपूर होती म्हणून धायटी हे या वस्तीचे नाव पडले. पुढे धायरी गावाच्या एका सत्पुरुषाने (जैतुजीबाबाने) या वस्तीच्या पूर्वेकडील माळावर शिंगणापूरच्या महादेवाला पाण्याची धार घातली व त्या माळावर तिथे स्वयंभू महादेव प्रगट झाले, हा महादेव पाण्याच्या धारेपासून आला म्हणून तो धारेश्वर व धारेश्वराच्या नावावरून धायटीचे धायरी असे नाव झाले, असे सांगितले जाते.या अंबाईच्या मूर्तीचा पाषाण व प्रतापगडावरील भवानीमातेच्या मूर्तीचा पाषाण तसेच या मूर्तीच्या चेहऱ्याची घडण यात बरेच साम्य आहे. तसेच सिंहगडावरील कोंडाणेश्वराचे मंदिर व पूर्वीचे अंबाईचे मंदिर यांचे बांधकाम तंतोतंत होते. आता नवरात्रीनिमित्त मंदिरात दर वर्षी विविध कार्यक्रम होतात. श्री अंबाईमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, तर रमेश पोकळे उपाध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष चंद्रकांत वांजळे, सचिव भाऊ कामठे, खजिनदार बाजीराव चौधरी, तर मदन भोसले, बाळासाहेब कामठे, चंद्रकांत पोकळे, सोपान लायगुडे, हिरामण पोकळे सदस्य आहेत. (प्रतिनिधी)४शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा परिसर आल्यावर त्यांनी सैन्यातील चार नामवंत अंमलदार या अंबाईच्या दऱ्यात आणले. ४ते चार अंमलदार म्हणजे पवार, रायकर, चव्हाण व लायगुडे. या चौघांना त्यांच्या कुटुंबीयांसह येथे स्थायिक करून येथे माता अंबाईची स्थापना केली व शेजारच्याच दऱ्यात म्हणजे म्हसोबाच्या दऱ्यात एका विहिरीच्या जागेची पूजा केली व तेथे विहीर खोदण्यास सांगितले. ४ही गावची विहीर म्हणजे म्हसोबाची विहीर. या विहिरीजवळच महाराजांनी तत्कालिन धायरी गाव वसवले आणि या चौघा कुटुंबीयांपैकी पवारांना या गावची पाटीलकी दिली. ४हे पवार म्हणजेच आजचे पोकळे पाटील होत. त्यानंतर चव्हाण, पाटील व रायकर यांच्याकडे पोलीस पाटीलकी आली. स्वत: महाराजांनी अंबाईचा दरा, म्हसोबाचा दरा, वेलदरा, कडकाईचा दरा, महलाईचा दरा, सटवाईचा आडसर, कळकाईची बेंद व भैरोबाची घानवड या जमिनी या चौघा कुटुंबीयांना वाटून दिल्या आणि माता अंबाईला या ग्रामवासीयांचे रक्षण कर म्हणून प्रार्थना केली. असं हे धायरी गावचं दैवत ‘माता अंबाई.’
धायरी गावची ऐतिहासिक अंबाई
By admin | Updated: October 13, 2015 01:16 IST