वाकड : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहोरात्र विनापरवाना मद्यविक्री करणार्या चार हॉटेलवर शनिवारी मध्यरात्री छापे टाकून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. हॉटेल चालक आणि कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेल रानजाईचे चालक दीपक प्रताप कलाटे (रा. वाकड), हॉटेल रॉयल एक्झॉटिकाचे मालक गुरुप्रीतसिंग इंदरसिग उप्पल ऊर्फ लव्हली (वय ४०, रा. वानवडी, पुणे) व हॉटेल इटर्नियाचे मालक रमिंदरसिंग ऊर्फ गोल्डी सुरेंदरसिंग नारंग (वय ३७, रा. रास्ता पेठ, पुणे) यांच्यासह अभिषेक शंकर कानटे, उमेश शांताराम राऊत, अभिमन्यू राम नायक, महेश डंबर बहाद्दूर, रूपेश रामप्रवेश साहू, ग्यामलाल दालेंद्र घेमीरे व प्रफुल्ल कृष्णचंद नाईक या कामगारांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
चार हॉटेलवर हिंजवडीत छापे
By admin | Updated: May 26, 2014 05:09 IST