शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागच आता घडविणार ‘स्पेशालिस्ट’

By admin | Updated: July 26, 2015 00:28 IST

सरकारी रुग्णालय म्हटले की तेथे डॉक्टर नाहीत... ही ओरड राज्याच्या सर्व भागांमध्ये नेहमीचीच. स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरच मिळत नसल्याने राज्यातील अनेक शासकीय

-  राहुल कलाल,  पुणे सरकारी रुग्णालय म्हटले की तेथे डॉक्टर नाहीत... ही ओरड राज्याच्या सर्व भागांमध्ये नेहमीचीच. स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरच मिळत नसल्याने राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये ही पदे रिक्त आहेत. त्याचा विपरीत परिणाम आरोग्यसेवेवर पडत असल्याने ही पदे भरण्यासाठी आता राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग पुढे सरसावला आहे आणि त्यांनी स्वत:च अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय वैद्यकीय शिक्षण नावाने कार्यरत आहे. राज्यात त्यांच्यामार्फतच पदव्या आणि पदव्युत्तर पदवी, पदविकेचे अभ्यासक्रम मान्य केले जातात. परंतु, त्यांच्याकडून आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयात पुरेशा स्पेशालिस्ट डॉक्टरांचा पुरवठा होत नव्हता. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयांमधील जागा आणि त्यांचे पगार हे खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी असल्याने डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणारे तरुण सरकारी नोकरीकडे वळत नव्हते. या दोन्ही कारणांमुळे गेल्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती.राज्यात अनेक ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालये, स्पेशालिटी विभाग उभारण्यात आले आहेत. मात्र, त्या रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्टच नसल्याचे चित्र होते. त्यामुळे ही रुग्णालये पांढरा हत्ती ठरू लागली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने स्वत: पदव्युत्तर पदविका याचे ८ विषयांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. ते लगेचच सुरू होणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरूवातआरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०१५-१६ पासून हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. हे सर्व अभ्यासक्रम मुंबईतील कॉलेज आॅफ फिजीशियन अ‍ॅन्ड सर्जन्स या संस्थेच्या मानकानुसार घेतले जाणार आहे आणि या संस्थेची पदवी आरोग्य विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांना दिली जाईल. हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम होणार सुरू डिप्लोमा इन आॅलथॅलमिक मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरीडिप्लोमा इन गायनॅकॉलॉजी अ‍ॅन्ड आॅबस्टेट्रिक्सडिप्लोमा इन चाईल्ड हेल्थडिप्लोमा इन पॅथॉलॉजी अ‍ॅन्ड बॅक्टेरीआॅलॉजीडिप्लोमा इन अ‍ॅनेस्थेशियाडिप्लोमा इन सायकॅट्री मेडिसिनडिप्लोमा इन ट्युबरकुलोसिस डिसिजेसडिप्लोमा इन ट्रान्स्फ्युजन मेडिसिनस्पेशालिटीसाठीच्या रिक्त जागा ७-८ वर्षांत भरण्यासाठीचा प्रयत्नसध्या सरकारी रुग्णालयांमध्ये १४ स्पेशॅलिटी विभाग चालविले जातात. या विभागांमध्ये त्या-त्या विभागातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता असते. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आम्हाला हे स्पेशालिस्ट डॉक्टर १ वर्षाच्या बॉन्डसाठी मिळतात. परंतु ते एका वर्षानंतर निघून जातात. त्याचबरोबर थेट भरती केली जाते. पण या भरतीला अल्प प्रतिसाद मिळतो. त्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे रिक्तच राहतात. सध्या राज्यात अशी १८०० स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. दर वर्षी साधारणत: ८२ स्पेशालिस्ट डॉक्टर मिळतात. असे राहिले तर ही पदे भरण्यासाठी ३०-४० वर्षे लागतील. हे रोखण्यासाठी आणि सरकारी रुग्णालयातील सुविधा वाढविण्यासाठी आम्ही हे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमातून दर वर्षी सुमारे २०० ते २५० स्पेशालिस्ट डॉक्टर आम्हाला मिळतील आणि रिक्त पदे ७-८ वर्षांत भरली जातील.- डॉ. सतीश पवार,संचालक, राज्य आरोग्य विभाग