शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यातील दोन वाहनचालकांना उलटय़ा व मळमळ होऊ लागल्याने येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. घातक कचरा प्रक्रिया करणा:या या कारखान्यातील ही तिसरी (समजलेली) घटना आहे. घातक द्रव्याच्या संपर्कात आल्याने वायू नाकातोंडात जाऊन हा त्रस होत असून, कारखाना कामगारांच्या सुरक्षेविषयी निष्काळजी असल्याचे अनेकदा आढळून आले आहे.
अरुण भागुजी घुले (वय 3क्) व नानासाहेब तुकाराम सोलाट (3क्) अशी रुग्णालयात दाखल केलेल्या वाहनचालकांची नावे आहेत. हे दोघेही कारखान्याच्या घातक कच:याची वाहतूक करणा:या वाहनांचे चालक म्हणून कामाला आहेत. या कारखान्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यातील घातक व इतर कचरा येतो. यात घातक कचरा भस्मीकरण करण्याची प्रक्रिया करणो व इतर जमिनीखाली गाडणो अशा प्रकारचे काम कारखान्याने करणो बंधनकारक आहे. अनेक कारखान्यांचे घातक द्रव्य या कारखान्यात येते. घातक कच:याची अतिदक्षता घेऊन विल्हेवाट लावणो गरजेचे आहे. याचे काम करणा:या कामगारांना हेल्मेट, हातमोजे, मास्क या प्रकारची सुरक्षित उपकरणो पुरविणो कारखान्याला बंधनकारक आहे. मात्र, अशी उपकरणो पुरवली जात नसल्याने कामगारांना त्रस सहन करावा लागत आहे.
घुले व सोलाट हे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतून घातक व इतर कचरा कारखान्याच्या वाहनातून कारखान्यात आणण्याचे काम करतात. गाडी कारखान्यात आल्यावर कचरा खाली करेर्पयत त्यांना तेथेच थांबावे लागते. आज या दोन वाहनचालकांना उलटय़ा झाल्या. मळमळ होऊन अस्वस्थपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2क्क्7मध्ये अशाच प्रकारे त्रस झाल्याने या कारखान्यांतील 32 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 8 ते 15 दिवसांच्या उपचारांनंतर या कामगारांना घरी सोडण्यात आले होते. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पाचंगेंना दिलेले बैठकीचे आश्वासनही पाळलेले नाही. या कारखान्याच्या आवारात घातक द्रव्याचे (कचरा) हजारो ड्रम प्रक्रियेविना पडून आहेत. भस्मीकरण प्रक्रियाही बंद आहे. कारखाना आवारात कामगारांना वायुसंसर्ग होऊन एवढा त्रस होत असेल, तर भविष्यात आसपासची गावेही विषारी वायूने प्रभावित होण्याची भिती आहे. (वार्ताहर)
42क्1क् मध्ये 12 कामगारांना डोळ्यांचा त्रस झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतरची आजची (समजलेली) घटना आहे. या घटना काही कामगारांकडून माहिती मिळाल्याने समजू शकल्या. अनेक घटना कारखाना व्यवस्थापनाने समजू दिल्या नाहीत. उपचारांनंतर वैद्यकीय अहवालाची प्रतही हे व्यवस्थापन कामगारांना देत नसल्याचे एका कामगाराने सांगितले. या कारखान्याच्या विरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पर्यावरण मंत्रलयाकडे तक्रार केली असून, याच महिन्याच्या 4 तारखेला त्यांनी कारखाना गेटवर आंदोलनही केले.