शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गुढी उभारू पाणीबचतीची !

By admin | Updated: April 8, 2016 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्यातील अनेक हॉटलमध्ये पाणीबचतीचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहकांनी साथ दिल्यास त्याला आणखी बळ मिळून दररोज ६७ टॅँकर पाणी वाचविणे शक्य आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक भान जपले असले, तरी ग्राहकांकडूनच त्याला अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. पूर्ण ग्लास पाण्याऐवजी अर्धा ग्लास दिला, तर ग्राहकांना ते उष्टे पाणी वाटते. वेटरला याबाबत बोलले जाते. ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाला, तर पाणीबचत होणे शक्य आहे. पुणे शहराची गेल्या दीड दशकात झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्येने ३५ लखांचा टप्पा ओलांडला असून मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायही वाढलेला आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवंलबून असून स्वयंपाक, ग्राहकांना पिण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची स्थिती समजून घेऊन बचतीची गरज आहे.महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ४५२ अमृततुल्य आहेत. या ठिकाणी पुणेकरांसह विद्यार्थी तसेच नोकदार वर्गाची गर्दी संपूर्ण दिवसभर असते. या प्रत्येक अमृततुल्यामध्ये दिवसाला सरासरी तीनशे ग्राहक गृहीत धरल्यास शहरात १ लाख ३५ हजार ६०० ग्राहक होतात. या ग्राहकांनी एकदा जरी चुळ भरली तरी त्यासाठी सर्वसाधारणपणे ५० मिलिलिटर पाणी गृहीत धरल्यास ६,७८० लिटर पाणी नुसते गुळणी करण्यासाठी वाया जाते. हे पाणी दिवसाला एका टँकरएवढे आहे. तर, महिन्याला 30 टँकरएवढे आहे. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना ‘पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे; गुळणीसाठी नाही’ एवढाी सूचना दिली, तरी दररोज एक टँकर पाणी वाचविणे शक्य आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार, शहरात २२५७ हॉटेल असून, ती महापालिकेचे पाणी वापरतात. या हॉटेलमध्येही दिवसाला सरासरी ३०० ग्राहक गृहीत धरल्यास सरसरी ६ लाख ७७ हजार १०० ग्राहक शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये जातात. या वेळी या ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी दिले जाते.अनेक ग्राहक दिलेले ग्लासभर पाणी पूर्र्ण पीत नाहीत. हे पाणी शिल्लक राहिल्यानंतर हॉटेल व्यावसायिक ते फेकून देतात. प्रत्येक ग्राहकाच्या ग्लासमधून सरासरी १०० मिलि पाणी शिल्लक राहिले, असे गृहीत धरल्यास दिवसाला ६ लाख ७७ हजार १०० लिटर पाणी वाचविणे शक्य आहे. एका टँकरमध्ये सरासरी १० हजार लिटर पाणी मावत असल्याने हे पाणी जवळपास ६७ टँकरएवढे आहे.