पुणे : विविध सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथीदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
गांधी भवन येथील राष्ट्रीय स्मारकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सम्राट अशोक सेनेचे संस्थापक विनोद चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नागेश भोसले, प्रीतम ढसाळ, संतोष सुरते, महेंद्र जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विशाल गद्रे यांनी पुष्पहार अर्पण केला. आमदार चेतन तुपे, मदन वाणी, सुरेश खाटपे, गौरव गिरे, बाबासाहेब ढमाले, संजय गाडे आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व समाजसेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद सवाणे, नगरसेवक प्रदीप गायकवाड, सुभाष वारे, लता भिसे, आकाश वाघ, विशाल नाटेकर आदी उपस्थित होते.