भोसरी : शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक, रंगलेले खेळ, ढोल ताशांचा टिपेला पोहचलेला स्वर, बँड पथकांच्या साह्याने व फुलांची आकर्षक सजावट करून सजविलेल्या रथात बाप्पांना रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मिरवणुकीने भोसरीकरांनी अत्यंत भावूक वातावरणात निरोप दिला. पीएमटी चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपात प्रत्येक मंडळाचे स्वागत केले. दरवर्षी भोसरीत अनंत चतुर्थी च्या आदल्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सायंकाळी ४ च्या सुमारास मुख्य मिरवणुकीला बापुजी बुवा चौकातून लांडगे आळी मार्गे सुरु वात झाली. सायंकाळी ६ नंतर चौकात हळूहळू सर्व मंडळाचे कार्यकर्ते ब्यांड पथके ढोल-ताशासह हजर झाले. चौकातून रांगेने ६ नंतर मिरवणूक शिस्तबद्ध सुरु होती. पुणे पिंपरीतील विविध शाळेतील ढोल-ताशांच्या पथकांनी आपल्या खेळानि मिरवणुकीत एकच रंगत आणली होती. आकर्षक खेळ व शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे संपूर्ण मिरवणूक प्रेक्षणीय ठरली. काही मंडळानी फुलांच्या सजावटीबरोबर देखावेहि मिरवणुकीत सादर केले. लांडगे लिंबाची तालीमीचा मनाचा गणपती, छत्रपती शिवाजी मंडळाचा भोजापूरचा राजा, पठारे लांडगे तालमीचा, गव्हाणे तालीम, श्रीराम मित्र मंडळ, फुगे माने तालीम, लोंढे तालीम, माळी आळी मित्र मंडळाचा, भाजी मंडई, जय महाराष्ट्र मित्र मंडळ व भोसरी गावातील सर्व मंडळाच्या मिरवणुका भोसरी गावठानातून बापुजी बुवा चौकातून मुक्या मिरवणूक मार्गाने विसर्जनासाठी मार्गस्त झाल्या. काही मंडळानी सर्वांन सोबत जाण्याची वाट न पाहता आज सकाळपासून विसर्जन मिरवणुक सुरु केली होती. दुपारी एकला पहिला गणपती विसर्जन झाला. महापालिकेच्या वतीने अंकुशराव नाट्यगृहाशेजारील विहीर व विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आला होता. (वार्ताहर)
ढोल-ताशांच्या दणदणाटात भोसरीत गणरायाला निरोप
By admin | Updated: September 8, 2014 04:08 IST