शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक द्या

By admin | Updated: May 26, 2014 05:31 IST

वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकांची मागणी रुग्ण कल्याण समितीने केली आहे

मार्गासनी : वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकांची मागणी रुग्ण कल्याण समितीने केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकपद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनास काम करताना अडथळे येत असून एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर सर्व रुग्णालयाची जबाबदारी पडली आहे. वेल्हे ग्रामीण रुग्णालयाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथे वैद्यकीय अधिक्षकपद रिक्त आहे. वेल्हे तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय असून तालुक्यातील नागरिकांसाठी हे आरोग्य सेवेसाठी उपयोगी आहे. तसेच आर्थिकदृष्टया गरीब नागरिक उपचारासाठी येत आहेत. परंतु येथे अधिक्षकपद रिक्त असल्याने नागरिकांना येथे सुविधाच मिळत नाही. वारंवार उपचारासाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात सोमवार व शुक्रवार रुग्ण येत असतात. कर्मचारीपदे रिक्त असल्याने येथील प्रशासन व्यवस्था ढासळली असून पर्याय म्हणून भोर येथील उपजिल्हा अधिक्षकांची वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी तात्पुरती नेमणूक केली आहे. परंतु हे अधिक्षक फक्त शुक्रवारी चार वाजता येतात. प्रशासन त्यामुळे येथे सुविधा व्यवस्थित मिळत नाही. फक्त कर्मचार्‍यांचे पगार काढणे एवढेच काम ते अधिक्षक करत आहेत. (वार्ताहर)