शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वापरात नसलेली अक्षरे वगळावीत

By admin | Updated: January 11, 2017 03:35 IST

भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे

पुणे : भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे असा शुद्धलेखनाचा विचार होऊ शकतो. वर्णमालेतील वापरात नसणाऱ्या अक्षरांचा पुनर्विचार व्हावा आणि उपयोग नसल्यास ही अक्षरे वगळावीत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. मसापचे परीक्षा विभागाचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी ती तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. प्र. ना. परांजपे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. या समारंभाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘प्रत्येक भाषेमध्ये शुद्धलेखनाबाबत शंका असतात. त्यांची चर्चा होऊन सुवर्णमध्य काढला जाणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये शुद्धलेखन पुस्तिकेबाबतचा मुद्दा चर्चेला घेऊन अनुदान प्राप्त करण्याचा प्रयत्न करून अल्पदरात पुस्तिका अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.’राजगुरू म्हणाले, ‘भाषाव्यवहार, लेखनव्यवहारामध्ये शुद्धलेखन महत्त्वाचे असते. भाषेबाबत अनेकदा चुकीच्या संकल्पना रूढ असतात. त्यामुळे चुकीचे नियम बरोबर वाटू शकतात. त्यासाठी शुद्धलेखन पुस्तिका मार्गदर्शक ठरू शकते.’