पुणो : विद्युत यंत्रणोतील फ्रिक्वेन्सी दोलायमान असल्याने पुणो जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत मंगळवारी (दि. 3क्) सुमारे दीड तास चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले.
पॉवरग्रीडच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शनिवार पासून (दि. 27) राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. देशपातळीवर विजेच्या मागणीच्या तुलनेत पुरवठय़ाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणोची फ्रिक्वेन्सी खालावत आहे. विजेची वाढती मागणी व फ्रिक्वेन्सीमधील दोलायमान स्थिती यामुळे राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावे लागले. पुणो व पिंपरी-चिंचवड शहरातील 439 पैकी 212 वाहिन्यांवर दीड तासाचे भारनियमन करावे लागले. एकाच वेळी भारनियमन न करता शहरातील विविध भागांत चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले.
दरम्यान, ऑक्टोबर हिटमुळे विजेच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या ही मागणी 16 हजार 858 मेगावॉटर्पयत वाढली आहे. मागणी पुरवठय़ाच्या व्यस्त प्रमाणामुळे विद्युत पुरवठा करण्यात अडचण येत आहे. तसेच, पारेषण यंत्रणोच्या मर्यादेमुळे बाहेरून आणखी वीज आणण्यावरदेखील मर्यादा आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या काळात शक्य तेथे विजेचा वापर कमी करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ऑक्टोबर हीट व कृषी पंपांची वाढलेली मागणी यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या काळात विजेची मागणी 4 हजार 6क्क् मेगावॉटने वाढली आहे. गेल्या वर्षी या काळात 12 हजार 24क् मेगावॉट विजेची मागणी होती. त्यात 16 हजार 858 मेगावॉट र्पयत वाढ झाली आहे. सोमवारी (दि. 29) महावितरणने 362.68 दशलक्ष युनिट्स विद्युत पुरवठा करुन नवीन उच्चंक गाठला आहे. मात्र, वीज उपलब्ध असूनही फ्रिक्वेन्सीतील दोषामुळे मागणीप्रमाणो विद्युत पुरवठा करता आला नसल्याचे महावितरणच्या अधिका:यांनी सांगितले.