निगडी : गणोशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच निगडी-यमुनानगर-प्राधिकरण परिसरातील मंडळांनी देखावे सादर केल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पौराणिक, धार्मिक, सामाजिक देखाव्यांबरोबरच जनजागृतीविषयी संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
निगडीतील जय भवानी तरुण मंडळाने परंपरेनुसार धन्य तुळशीचा महिमा हा जिवंत देखावा सादर केला आहे. देखाव्यात शिवशंकर-पार्वती, वृंदा, नारदमुनी व जालंदर राक्षसाची भूमिका कलाकार सादर करीत आहेत. संतोष काळभोर मंडळाचे अध्यक्ष असून, मंगेश काळभोर उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 24 वे वर्ष आहे.
निगडी गावठाणातील शिवछत्रपती मित्रमंडळाने प्रवास महाराष्ट्राच्या कुलदैवताचा संगीत गीतांचा कार्यक्रम सादर केला आहे. स्वप्निल मनोहर, सागर भिंगारदेवे व त्यांचे सहकारी कार्यक्रमाचे सादरीकरण करीत आहेत. तुकाराम काळभोर उत्सवाचे संयोजक असून, नागेश रावनगावे मंडळाचे अध्यक्ष आहेत. धनंजय देशमुख उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 19 वे वर्ष आहे.
निगडी गावठाणातील जय बजरंग तरुण मंडळाने सादर केलेला श्री दत्तात्रय यांचा जन्म हा हलता देखावा सादर केला आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे मंडळाचे अध्यक्ष आहेत. संदीप कवडे मंडळाचे उपाध्यक्ष असून, अभिजीत भालसिंग, विजय गांगुर्डे, हरिश सटाणकर, शंकर काळभोर, सतीश ङोंडे विशेष परिश्रम घेत आहेत. मंडळाचे 57 वे वर्ष आहे.
येथील ओम शिवतेज मित्रमंडळाने 25 फुटी गजरथ तयार केला आहे. गजरथावर श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. धनेश कासार मंडळाचे अध्यक्ष तर विवेक जगताप उपाध्यक्ष आहेत. समीर जावळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मंडळाचे 21 वे वर्ष आहे. यमुनानगरमधील शिवप्रेमी तरुण मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. रवींद्र खिलारे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाचे 27 वे वर्ष आहे. सुवर्णयुग मित्रमंडळाने आकर्षक रोषणाई केली असून, मुलांसाठी विविध गुणदर्शन, रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाचे 23 वे वर्ष आहे.
प्राधिकरणातील सेक्टर 27 मधील शरयुनगर प्रतिष्ठानाने साईलीला हा हलता देखावा सादर केला आहे. देखाव्यात 35 मूर्ती आहेत. मंगेश कोंडे मंडळाचे अध्यक्ष, तर अखिलेश भालेकर उपाध्यक्ष आहेत. सचिन शिंदे कार्याध्यक्ष आहेत. विकास ताकवणो, नितीन ढमाले यांचे मंडळाला मार्गदर्शन लाभत आहे. मंडळाचे 35 वे वर्ष आहे. शिवशाही मित्रमंडळाने फुलांची सजावट, रोषणाई, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तेजस कुलकर्णी मंडळाचे अध्यक्ष, तर केतन जाऊळकर उपाध्यक्ष आहेत.
सेक्टर 25 मधील सिंधुनगर युवक मित्रमंडळाने रोषणाई केली आहे. अरुण थोरात मंडळाचे अध्यक्ष असून, किशोर गवळी उपाध्यक्ष आहेत. भेळ चौकातील ओम साई मित्रमंडळाने सजावट केली आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी स्पीकर लावले नाहीत. अजिंक्य जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाचे पाचवे वर्ष आहे. जयहिंद मित्रमंडळाने निसर्गाने ‘घातला घाव कालिका माते धाव’ हा देखावा सादर केला आहे. माळीणगाव दुर्घटनेवर आधारित हा देखावा आहे. राजेश फलके अध्यक्ष, तर विजय भोसले उपाध्यक्ष असून, राजीव उमाप उत्सवप्रमुख आहेत. मंडळाचे 29 वे वर्ष आहे. सेक्टर 27 अ मधील रस्टन कॉलनीतील अभिनव युवक गणोश मित्रमंडळाने कार्यक्रम घेतले. सुहास पाटील अध्यक्ष असून, भूषण नलावडे उपाध्यक्ष आहेत.(वार्ताहर)
4निगडीतील जय भवानी तरुण मंडळ : धन्य तुळशीचा महिमा हा जिवंत देखावा
4निगडी गावठाणातील शिवछत्रपती मित्रमंडळ : प्रवास महाराष्ट्राच्या कुलदैवताचा संगीत गीतांचा कार्यक्रम
4निगडी गावठाणातील जय
बजरंग तरुण मंडळ : श्री दत्तात्रय यांचा जन्म.
4ओम शिवतेज मित्रमंडळ : 25 फुटी गजरथ तयार केला आहे. गजरथावर श्रींची मूर्ती