चाकण : बोरदरा (ता. खेड) गावच्या हद्दीतील खिंडीच्या घाटात कंपन्यांवर रात्री धाडसी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला दोन वाहने, लोखंडी गज, चाकू, कुकरी, मिरची पावडर आदी घातकशास्त्रंसह जेरबंद करण्यात आले असून, या टोळीकडून दरोडय़ात वापरण्यात आलेली दोन वाहने व घातकशास्त्रे चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
तसेच, अन्य दोन फरारी चोरटे ग्रामस्थांना हिसका देऊन पळून गेल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.
संजय रामभाऊ भालसिंग (वय 28 वर्षे, सध्या रा. गणपती मंदिरासमोर, ङिात्रईमळा, चाकण, मूळ रा. भालसिंगवाडी, कोळीये, ता. खेड), रमेश रामभाऊ भालसिंग (वय 32 वर्षे, रा. भालसिंगवाडी, ता. खेड), साकीर अली साबीरअली सिद्दकी (वय 27 वर्षे, सध्या रा. वासुलीफाटा, ता. खेड, मूळ रा. ता. डुमरीयागंज, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), तोहिद मगसूद अन्सीर (वय 3क् वर्षे, सध्या वासुलीफाटा, ता. खेड, मूळ रा. ता. रहाटा, जि. हमीदपूर, उत्तर प्रदेश) व राजेश वैद्यनाथ चौरसिया (वय 28 वर्षे, सध्या रा. वासुलीफाटा, मूळ रा. वरईटोला, ता. खालिदाबाद, जि. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर, श्याम व फैयाज हे दोन चोरटे फरार झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती अमृत पडवळ (वय 35 वर्षे, रा. साईघरवस्ती बोरदरा, ता. खेड) यांनी या घटनेची खबर चाकण पोलीस ठाण्यात दिली.
बोरदरा (ता. खेड) गावच्या हद्दीतील खिंडीच्या घाटात वरील चोरटे संशयितरीत्या आढळून आले. त्यामुळे बोरदरा येथी माजी सरपंच बाबासाहेब पडवळ, मारुती पडवळ आदींसह शेकडो कार्यकत्र्यानी 7 जुलै रोजी रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान त्यांना घेराव घालून मोठय़ा धाडसाने पकडले. व त्यांच्या वाहनांसह त्यांना चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांची चौकशी केली असता, ते कंपनीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले.
बोरदरा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दरोडय़ातील चोरटे जेरबंद करण्यात चाकण पोलिसांना यश आले असून, या चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर पाटील व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
4या चोरटय़ांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चाकण पोलिसांनी सुमोगाडी (एमएच 14 बीआर 482क्) व स्नेहा ट्रान्सपोर्टचा 4क्7 टेम्पो (एमएच 14 डीएम 8क्74) ताब्यात घेतला आहे. त्याचप्रमाणो त्यांच्याकडून एक लोखंडी कटर, मिरची पावडर, नायलॉन दोरी, कुकरी, चाकू आदी घातक शस्त्रे जप्त केली आहेत.