शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

भाजपाची रणनीती झाली यशस्वी

By admin | Updated: February 24, 2017 03:14 IST

महापालिकेमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून, स्वबळावर बहुमत मिळविण्याचा शब्द खरा ठरविला आहे

पुणे : महापालिकेमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून, स्वबळावर बहुमत मिळविण्याचा शब्द खरा ठरविला आहे. भारतीय जनता पक्षाने आखलेली रणनीती यशस्वी ठरली असून, निवडणुकीच्या काळातील भाजपासंदर्भातील वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोपांना मतदारांनी काडीचीही किंमत दिलेली नाही. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला २६ जागा मिळालेल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महापालिकेवरही भाजपाचा झेंडा रोवायचा निर्धार भाजपाच्या वतीने करण्यात आला. निवडणुकीच्या काही महिने अगोदर खासदार संजय काकडे भाजपामध्ये सक्रिय झाले. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह ८ ही आमदार महापालिकेत सत्ता मिळविण्याच्या दिशेने नियोजन आखत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातले होते.निवडणुकीला ६ महिने बाकी असताना भाजपाकडून प्रत्येक प्रभागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ए, बी, सी व डी अशी जागांची वर्गवारी करण्यात आली. जिथे भाजपाचे नगरसेवक सहजपणे विजयी होतील त्या जागांना ए, थोडीशी लढत द्यावी लागेल त्या बी, अवघड असलेल्या सी व निवडून न येऊ शकणाऱ्या डी असा तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर सी व डी जागा जिंकण्यासाठी भाजपाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषत: उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले होते. संजय काकडे यांच्या पुढाकारातून भाजपा कमकुवत असलेल्या ठिकाणी इतर पक्षांमधून आजी व माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा धडाका लावण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीही काहीजणांना पक्षात घेतले. यामुळे संपूर्ण शहरात भाजपाची जोरदार वातावरण निर्मिती झाली. भाजपाकडे उमेदवारी मागण्यासाठी १६२ जागांकरिता एक हजारपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न भाजपासमोर उभा होता. उमेदवारी यादी निवड करण्यासाठी भाजपाच्या कार्ड कमिटी सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. उमेदवारी देण्यावरून मोठी नाराजी पक्षात निर्माण झाली होती; मात्र निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवारी देण्यात आल्याचा फायदा भाजपाला झाला. (प्रतिनिधी)हजारी याद्यांची यंत्रणा यशस्वीभाजपाने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हजारी भाग प्रमुखांची नेमणूक करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये तब्बल २७०० जणांनी सहभाग घेतला. या हजारी भाग प्रमुखांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.विजयासाठी या ठरल्या महत्त्वाच्या बाबी१ चार सदस्यीय प्रभाग पद्धत.२ आजी-माजी नगरसेवकांसह अनेक मातब्बरांना पक्षात प्रवेश देऊन पक्षाला बळकटी.३ मेट्रो, जायका प्रकल्प, विकास आराखडा यांना मंजुरी.४ शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा.५ केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर, व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा झंझावाती प्रचार.६ प्रत्येक टप्प्यावर सर्व्हे करून व्यूहरचनेत बदल.