शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यातही येणार वाढीव बिले

By admin | Updated: May 23, 2016 01:46 IST

सांगवी महावितरण विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना, ग्राहकांना बसत आहे. याही महिन्याचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने नागरिकांना पुढील महिन्यात वाढीव बिले मिळणार आहेत

सांगवी : सांगवी महावितरण विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना, ग्राहकांना बसत आहे. याही महिन्याचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने नागरिकांना पुढील महिन्यात वाढीव बिले मिळणार आहेत. तसेच वाकड परिसरात वीजबिलांचे वाटप झाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.सांगवी महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. या कार्यालयांतर्गत थेरगाव, वाकड, सांगवी, हिंजवडी परिसराचा समावेश आहे. वीज मीटरचे रिडिंग घेणे आणि वीजबिलांचे वाटप करण्याचे काम खासगी संस्थांना दिले आहे. मात्र, या कामांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रिडिंग घेणे आणि ते निर्धारित वेळेत अपलोड करणे या कामात अनियमितता असल्याने परिणामी मार्च, एप्रिल महिन्यांची बिले दहा ते पंधरा दिवसांनी वाढीव आली आहेत. याबाबत महावितरणचा शॉक असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वाढीव बिले कशी आली, हे पुराव्यासह ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. लोकमतचे वृत्त आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे सांगवीतील कार्यालयात वीज बिल दुरुस्तीसंदर्भात फलक लावण्यात आला आहे. चाळीस दिवसांचे रिडिंग आले, ही चूक त्यांनी झालेली चूक कबूल केली आहे. विभागानुसार रिडिंग घेण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे. मे महिन्याचे रिडिंगही वेळेवर आलेले नाही. पाच ते पंधरा दिवसांचा विलंब त्यास झालेला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातही वाढीव दराने बिले येणार आहेत. (वार्ताहर)वीज बिलांचे वाटप नाहीकाटेपुरम परिसर, कृष्णा चौक, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, विशालनगर या भागांचा समावेश या कार्यालयात आहे. वाकड, ताथवडे परिसरात महिना संपला, तरी वीजबिलांचे वाटप झालेले नाही. तसेच बिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर ते दोनशे तक्रारी कार्यालयात येतात. वादावादी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे डुप्लिकेट बिले घेण्याचे प्रमाण वाढले आहे.वाढीव बिलांची चूक केली कबूल ४सांगवी कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने फलक लावलेला आहे. त्यावर वाकड, ताथवडे, हिंजवडी भागातील ग्राहकांना कळविण्यात येते की, एप्रिल महिन्यापासून रिडिंग घेणारी एजन्सी बदलल्याने विजेची बिले तीस दिवसांऐवजी चाळीस दिवसांची आली आहेत. पुढील महिन्यापासून वेळेत बिले देण्यात येतील, अशी सूचना कार्यकारी अभियंता यांनी कार्यालयात लावलेली आहे. चूक कबूल झाली असली, तरी वाढीव बिले मिळाली, त्यांचे काय, याचे उत्तर कोणाकडेही नाही. बिलामागे मिळतात चार रुपये४वीजबिलांचे रिडिंग हे फोटोच्या साह्याने घेतले जाते. मीटरचा फोटो काढणे, बिल तयार करून नागरिकांना देणे या कामासाठी महावितरणकडून मोबदला देण्यात येतो. मीटरचे छायाचित्र घेण्यासाठी तीन रुपये आणि वीजबिल वाटपासाठी एक रुपया असे चार रुपये संबंधित संस्थेला देण्यात येतात. मात्र, या संस्थांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे.