शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

बावनकशी स्वयंसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

अखंड कार्यमग्न दिवंगत रामभाऊ म्हाळगी यांच्याकडे ऊर्जा कोठून येत, असा प्रश्न अनेकांना पडायचा. मतदारसंघातील दौरे, पक्षाचे कार्यक्रम, विधिमंडळ/ संसदेत ...

अखंड कार्यमग्न दिवंगत रामभाऊ म्हाळगी यांच्याकडे ऊर्जा कोठून येत, असा प्रश्न अनेकांना पडायचा. मतदारसंघातील दौरे, पक्षाचे कार्यक्रम, विधिमंडळ/ संसदेत उपस्थित राहतानाच रा.स्व. संघाच्या कार्यक्रमांनाही ते आवर्जून हजेरी लावत. अशा कमालीच्या व्यस्त कार्यक्रमपत्रिकेने रामभाऊ थकले आहेत असे दृश्य कधीच दिसायचे नाही. विलक्षण प्रतिभा आणि कार्यक्षमतेच्या रामभाऊंच्या स्मृतींना जन्मशताब्दी वर्षप्रारंभ निमित्ताने अभिवादन.

-खासदार गिरीश बापट

सोन्याचा अस्सलपणा ओळखण्यासाठी ज्या कसोट्या लावतात, त्या कसोटीवर उतरलेलं सोनं अस्सल बावनकशी म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकत्व परखण्याच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांवर रामभाऊ म्हाळगी हे व्यक्तिमत्त्व पुरेपूर उतरले होते. समर्पण, त्याग, कर्त्यव्यकठोर, निष्काम चारित्र्य अशा अनेक गुणांचा मनोहारी समन्वय असलेले रामभाऊ हे बावनकशी स्वयंसेवक होते. संघ स्वयंसेवक या सात शब्दांमागे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या मनात आदर्श स्वयंसेवकाचे जे प्रारूप होते ते रामभाऊंनी त्यांना दायित्व दिलेल्या राजकीय क्षेत्रात प्रत्यक्षात आणले होते.

राजकारणात आमदार, खासदार अशा जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी या पदांना स्वयंसेवकत्वाच्या व्रतापेक्षा मोठे होऊ दिले नाही. स्वयंसेवक म्हणून सोपविल्या गेलेल्या दायित्वाचा भाग म्हणून लोकप्रतिनिधित्वाची झूल अंगावर घ्यावी लागते आहे, याची पक्की जाणीव ठेवत रामभाऊ अखेरपर्यंत समाजाच्या सेवेत कार्यरत राहिले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा? याचा आदर्श घालून दिला. “मतदार, लोक काम सांगणारच, ती सवडीने जमली तर करू,” असला अजागळ भाव रामभाऊंकडे नव्हता. आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींचा, समस्यांचा योजनाबद्ध पद्धतीने निपटारा करणारी अत्यंत कार्यक्षम यंत्रणा त्यांनी जन्माला घातली. जनतेच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्याची रामभाऊंची शिस्त आजकालच्या व्यावसायिक ‘मॅनेजमेंट गुरुं’नाही अनेक गोष्टी शिकवणारी होती. लोकप्रतिनिधीचे कार्यालय म्हणजे निवेदन, तक्रारींच्या फायलीचे ढिगारे असे सार्वत्रिक दृश्य दिसते. आपल्या निवेदनाची, तक्रारीची तड केव्हा लागणार याच्या प्रतीक्षेत सर्वसामान्य माणूस लोकप्रतिनिधीकडे हेलपाटे मारत राहतो. एकूणच हा सगळा मामला 'रामभरोसे' असतो.

पण रामभाऊंकडे असल्या गबाळेपणाला, अस्ताव्यस्तपणाला थारा नव्हता. तक्रारींचा, समस्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची म्हाळगींची कार्यपद्धती प्रचंड शिस्तबद्ध होती. येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद करून त्या तक्रारीचे पुढे काय झाले, याची सविस्तर नोंद रामभाऊंकडे तयार असे. संगणकाने आज अशा नोंदींच्या सोयी सोप्या करून टाकल्या आहेत. पण कागद आणि लेखणी एवढ्या मर्यादित साधनांच्या बळावर रामभाऊंनी राज्य शासन, केंद्र सरकार, महापालिका अशा वेगवेगळ्या सरकारी पातळीवर केलेला पाठपुरावा थक्क करणारा आहे. “हा प्रश्न माझ्या मतदारसंघातील नाही,” अशी सोयीची भूमिका घेऊन अनेक लोकप्रतिनिधी एखाद्या प्रश्नाबाबत, समस्येबाबत हात झटकून मोकळे होतात. रामभाऊंनी जबाबदारी झटकण्याचा असला मार्ग कधीच अवलंबला नाही. लोकप्रतिनिधीने जनसेवेत कार्यक्षेत्राची हद्द घालून घेऊ नये हा आदर्श त्यांनी आपल्या कृतीने घालून दिला.

संसद सदस्य झाल्यावर त्यांनी ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर अशी विभागवार कार्यालये सुरू केली होती. ते ठाणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. रूढ पद्धतीप्रमाणे त्यांनी फक्त ठाणे मतदारसंघासाठीच संपर्क कार्यालय सुरू केले असते तर त्याला कोणीच आक्षेप घेतला नसता. उपरोक्त सर्व ठिकाणी ते दीड महिन्यातून एकदा दौरा करून तेथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेत असत. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याचा एक अनुभव औरंगाबादकरांना १९८१ मध्ये आला होता. आपल्या संपर्क दौऱ्यात ते औरंगाबादेत आले असताना औरंगाबाद-मनमाड रेल्वे रुंदीकरणासाठी त्यावेळच्या रेल्वे अर्थसंकल्पात १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली. ही तरतूद अत्यंत अल्प असून ही तरतूद वाढवणे आवश्यक आहे. अशा अर्थाचे निवेदन तेथील नागरिकांतर्फे म्हाळगी यांना देण्यात आले. रामभाऊंनी दिल्लीत गेल्यावर संबंधित मंत्र्याला तातडीने भेटून या संबंधातील जनतेच्या भावना कानावर घातल्या. त्यामुळे औरंगाबाद-मनमाड रेल्वे रुंदीकरणासाठीची तरतूद १ कोटी रु. पर्यंत वाढविण्यात आली. आपल्या मतदारसंघातील हा प्रश्न नाही, हा प्रश्न सोडवून मला काय राजकीय फायदा मिळणार अशा कोत्या विचारांना रामभाऊंकडे जागा नव्हती. आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातून विधानसभा अधिवेशन कामकाजासाठी प्रश्न पाठवीत असत.

रामभाऊंनी हयातभर आपले चारित्र्य निष्कलंक ठेवले. म्हणूनच ‘बावनकशी स्वयंसेवक’ ही उपाधी त्यांना सर्वार्थाने शोभणारी होती. लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन त्याच कामासाठी खर्च करण्याचा विशुद्धपणा त्यांनी दाखवला नाही. ही त्यागी, विरागी वृत्ती पाहून स्तिमित व्हायला होतं.