पुणो : पुणो महापालिकेच्यास्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव गंगाराम कर्णे (वय 64, रा. दत्त मंदिरामागे, येरवडा) यांच्या घरावर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये कर्णे गुरुजींच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. येरवडा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी दिली.
भिमराव बबन कांबळे (वय 23, रा. गांधीनगर, येरवडा), अभय महादेव म्हात्रे (वय 32, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कांबळे हा डीएड झालेला असून सध्या बेकार आहे. तर म्हात्रे याचे येरवडय़ामध्ये दुकान आहे. सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री कांबळे आणि म्हात्रे यांनी भरपुर दारु प्यायली होती. मद्यधुंद अवस्थेत हे दोघेही मोटारसायकलवरुन जात असताना हे दोघेही घसरुन पडले. त्यानंतर त्यांनी कर्णे यांच्या घराच्या दिशेने एक दगड भिरकावला.
हा दगड कर्णे झोपलेल्या खोलीच्या खिडकीवर लागला. खिडकीची काच फुटून नुकसान झाले. खिडकीच्या तुटण्याच्या आवाजाने कर्णे आणि त्यांचे कुटुंबिय जागे झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडे दफडफेकीबाबत चौकशी केली असता, त्यांच्या मोटार सायकलला समोरुन आलेला दुस-या मोटारसायकलने धडक दिली. त्यामुळे हे दोघे खाली पडले. समोरच्या मोटारसायकल चालकाला दगड मारत असताना चुकून कर्णेंच्या खिडकीला दगड लागल्याचे आरोपींनी सांगितले. परंतु आरोपींच्या सांगण्यामध्ये तथ्य आढळून येत नसल्याचे सोंडे म्हणाले. त्यामुळे या प्रकरणामागील कारण पोलीस शोधत आहेत. (प्रतिनिधी)
4हा दगड कर्णे झोपलेल्या खोलीच्या खिडकीवर लागला. खिडकीची काच फुटून नुकसान झाले. खिडकीच्या तुटण्याच्या आवाजाने कर्णे आणि त्यांचे कुटुंबिय जागे झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले.