लोणावळा : कॉँग्रेसचे पुणो जिल्हा सरचिटणीस डॉ़ किरण गायकवाड यांच्या हस्ते या वर्षी तळेगाव शहरात तब्बल 24 ठिकाणी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या आरत्या घेण्यात आल्या़ मावळ विधानसभेकरिता इच्छुक असलेल्या डॉ़ गायकवाड यांना मावळ तालुक्यासह तळेगाव शहरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. या भागातील युवकांनी डॉ़ गायकवाड यांच्या हस्ते गणपती आरती घेण्याला प्राधान्य दिले आह़े तळेगाव शहराप्रमाणोच वडगाव पोटोबामहाराज मंदिर, कामशेत व ग्रामीण भागात गावोगावी त्यांच्या हस्ते आरत्या करण्यात आल्या़
तळेगाव शहरात भेगडे तालीम मित्र मंडळ, डोळसनाथ गणोशोत्सव मंडळ, एकता मंडळ, गणोश मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ -दाभाडे आळी, शाळा चौक मित्र मंडळ, शिवक्रांती मित्र मंडळ, शिवराष्ट्र मित्र मंडळ, विक्रांत मित्र मंडळ, फ्रें ड्स सर्कल मित्र मंडळ, मास्करेन्हास मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळ, दत्तकृपा मित्र मंडळ, फ ालकेवाडी मित्र मंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, जिजामाता चौक, जय शंकर मित्र मंडळ, मुरलीधर मित्र मंडळ, राष्ट्रतेज मित्र मंडळ, वनराई मित्र मंडळ, विशाल मित्र मंडळ, भेगडेफ ार्म मित्र मंडळ दहिवली, पोटोबा मंदिर आदीसह ग्रामीण भागात विविध ठिकाणी डॉ़ गायकवाड यांच्या हस्ते आरत्या झाल्या. मावळ तालुक्यात प्रस्थापित राजकारण्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या जनतेला विकासाचा नवा चेहरा हवा आह़े सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ़ गायकवाड यांचा मावळच्या विकासाबाबतचा असलेला दृष्टिकोन विशेषत: तरुण वर्गाला व महिलांना मार्गदर्शक वाटत आहे. तरुणांची मोठी फ ळी त्यांच्या मागे उभी आह़े लोणावळा शहरासह ग्रामीण भागात तसेच तळेगाव, देहूरोड, वडगाव, नाणोमावळ परिसरात त्यांना प्रतिसाद मिळत आह़े (वार्ताहर)