पुणे : शहराचा सुधारित विकास आराखडा हा बांधकाम व्यवासायिकांच्या हितासाठी तयार करण्यात आला असून, त्याला विरोध करण्यासाठी पुणे विकास आराखड कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली असून, या आराखड्यात हजारे यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याची सुनावणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे ८७ हजार हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यामुळे हा आराखडाच चुकीचा असून तो रद्द करावा, तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून त्याची चौकशी करावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालणार असून, वेळ पडल्यास त्यासाठीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन हजारे यांनी कृती समितीच्या सदस्यांना दिले असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष नितीन जैन यांनी सांगितले. जयंत सदावर्ते, दत्तात्रय आठवले, श्रीराम थोरात या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘डीपी’साठी अण्णांना साकडे
By admin | Updated: May 25, 2014 04:38 IST