शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

भाटघर धरणात ९ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: April 4, 2016 01:27 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. नागरिक व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १५ मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने तर भाटघर धरणातून ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात २०१५ साली पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता ९ टक्क्यांवर आला आहे. नीरा देवघर धरणातही २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाण्याचा खांडवा भांडवली गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी असून धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटरी बंद पडत आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन मोटर विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. दोन मोटारींमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मंजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नसल्याचे कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. > एक किलोमीटरवरुन आणावे लागते पाणीवेल्हे तालुक्यातील बारा मावळ परिसरातील गुंजवणे येथील दरडिगेवस्ती येथील ग्रामस्थांना एक किलोमीटरवरून खोल दरीतून पाणी आणावे लागत आहे. लव्ही येथील ग्रामस्थांनादेखील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात आहे. परंतु, नदीतच पाणी नसल्याने विहिरीला पाणी नाही, तीन-चार दिवसांतून एकदा नळाला पाणी सोडले जाते, अशी माहिती पोलीस पाटील तानाजी रेणुसे व उपसरपंच अशोक रेणुसे यांनी दिली आहे.याबाबत टँकरचा प्रस्ताव २० दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे पाठविला आहे, परंतु अद्यापही या गावात टँकर सुरू झाला नाही. या परिसरातील सणसवाडी, देवपाल, चराटवाडी, वाजेघर गावांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील विविध गावातील पाणीपुरवठा योजना या नदीवरील पाण्यावर अवलंबून आहेत. तर या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याविना जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.गुंजवणी धरण उशाला असले तरी, या धरणावरून कोणतीही योजना न झाल्याने गावा-गावांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.