२६ जण व्हेंटिलेटरवरपुणे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज दिवसभरात या आजाराची लागण झालेले ३६ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे संसर्ग झालेल्यांची संख्या ४७२ वर पोहोचली आहे. यापैकी २६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.शहरात स्वाईन फ्लूने आतापर्यंत ३४ जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी २ हजार ७७३ जणांची तपासणी करून ४८४ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. ५६ जणांचे कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूची लागण झालेले ११६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बरे झालेल्या १८ जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे पुण्यात ३६ रुग्ण
By admin | Updated: March 5, 2015 00:24 IST