शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांसाठी १ हजार हेक्टर क्षेत्र

By admin | Updated: January 5, 2017 03:44 IST

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) दवाखाने, उद्याने, शाळा, खेळांची मैदाने, शैक्षणिक आदी ८५० आरक्षणे कायम ठेवण्यात आल्याने विकासकामांसाठी १

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) दवाखाने, उद्याने, शाळा, खेळांची मैदाने, शैक्षणिक आदी ८५० आरक्षणे कायम ठेवण्यात आल्याने विकासकामांसाठी १ हजार हेक्टर क्षेत्र महापालिकेला उपलब्ध होणार आहे. एकूण ३०९ आरक्षणे पालिकेने तयार केलेल्या आराखड्यात होती. सरकारी त्रिसदस्यीय समितीने ती काढून टाकली होती. आता राज्य सरकारने ती पूर्ववत ठेवली असल्याची चर्चा आहे. लक्ष्मी रस्त्यासह शहराच्या मध्यभागातील काही रस्त्यांचे रुंदीकरण त्रिसदस्यीय समितीच्या आराखड्यात होती. त्याला भारतीय जनता पक्ष वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. या रुंदीकरणाचे काय झाले, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, उद्याने पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असते. त्यासाठी महापालिकेला आवश्यक असलेल्या जागांवर आरक्षणे टाकणे, शहराचा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे, याची निश्चिती करणे आदी बाबींची पूर्तता विकास आराखड्यामध्ये केली जाते. विकास आराखड्याबरोबर बांधकाम विकास नियमावली (डीसी रूल) निश्चित केली जाते. त्यामध्ये घरांना बांधकामासाठी किती एफएसआय उपलब्ध असेल, टीडीआर वापरण्याचे धोरण काय असेल, बांधकाम परवान्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत नियम ठरविले जातात. मुख्य सभेने तसेच शासननियुक्त विभागीय आयुक्तांच्या समितीने आश्चर्यकारक पद्धतीने डीपीमधील ३७० आरक्षणे उठवून टाकली होती. या निर्णयाला स्वयंसेवी संस्था व सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. शहराच्या सर्व माजी महापौरांनी एकत्र येऊन आरक्षणे कायम ठेवावीत, यासाठी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. (प्रतिनिधी)असा आहे विकास आराखड्याचा इतिहासपुणे : सरकारने आता मंजूर केलेल्या विकास आराखड्याचा विचार १९६६ पासून होतो आहे. १९८७ मध्ये तो तयार झाला. जुन्या पुण्याच्या मध्यभागातील सुमारे ११० चौरस मीटर क्षेत्राचा यात विचार करण्यात आला आहे. हाच आराखडा त्यात वारंवार बदल करीत आता सन २०१६ पर्यंत आला आहे. एखाद्या शहराचा असा विकास आराखडा तयार करण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन स्तरांवर होते. सुरुवातीला प्रशासन हा आराखडा तयार करते. त्यानंतर हा विकास आराखडा लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या नियोजन समितीकडे सोपविला जातो. समिती त्यात लोकहित लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करते. त्यानंतर हा आराखडा सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी येतो. सर्वसाधारण सभेतही डीपीवर चर्चा होते, त्यानुसार आवश्यक ते बदल केले जातात. त्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविल्या जातात. त्यानुसार पुन्हा बदल करून आराखडा अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात येतो. त्यांच्याकडून तो नगरविकास खात्याकडे दिला जातो. तिथेही त्यावर चर्चा होते व आवश्यक असेल तर काही बदल करून तो सरकारकडे दिला जातो व सरकारकडून मंजुरी जाहीर केली जाते.आराखड्याबाबत तयार करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आरक्षण, रस्ता रुंदी, वाहतूक यांसारख्या अनेक गोष्टींवरून वादंग उठले. काही भूखंडांवर ठेवण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक गाजला. त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले असल्याचीही जोरदार चर्चा होत होती.त्यामुळेच राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने अचानक हा विकास आराखडा महापालिकेकडून काढून घेतला. त्यासाठी विलंब होत असल्याचे कारण दिले. सरकारने त्यानंतर आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने आराखडा तयार करण्यासाठी वर्षापेक्षा जास्त कालावधी घेतला. त्यावरूनही टीका होऊ लागली.अखेरीस समितीने आराखडा तयार केला व सरकारकडे सादरही केला. मात्र त्यात महापालिकेने केलेला आराखडा वगळून अनेक बदल करण्यात आले होते. विशेषत: सरकारी जागेवर टाकलेली सर्व आरक्षणे, काही खासगी जागांवरची आरक्षणे बदलण्यात आली. लक्ष्मी रस्त्यासारख्या शहराच्या जुन्या बाजारपेठेत रस्ता रुंदी सुचविण्यात आली. त्यावरून बराच गदारोळ झाला. समितीवर आरोप केले गेले, भाजपाच्या आमदार व मंत्र्यांवरही आरोप झाले.त्यानंतर सरकारकडून या आराखड्याला त्वरित मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण त्यालाही विलंब लावला गेला व आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा आराखडा मंजूर केल्याची घोषणा पक्षाच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र अद्याप त्यातील तरतुदी काय आहेत, ते जाहीर करण्यात आलेले नाही. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सगळेच याबाबत अनभिज्ञ आहेत.