शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:08 IST

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पडल्याने पाठीमागील दावेदार मानसिंगराव जगदाळे यांना यावेळी तरी नशीब साथ देणार का? का परत संजीवराजे यांनाच लॉटरी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पडल्याने पाठीमागील दावेदार मानसिंगराव जगदाळे यांना यावेळी तरी नशीब साथ देणार का? का परत संजीवराजे यांनाच लॉटरी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. त्यातच आताच्या आरक्षणामुळे अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी निवडीचा निर्णय हा शेवटी बारामतीवरूनच होईल, असेच संकेत मिळत आहेत. जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या ६४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले. सद्य:स्थिती पाहिलीतर राष्ट्रवादीकडे ४० सदस्य आहेत, तर काँग्रेसचे ७, भाजप ६, शिवसेना ३, सातारा विकास आघाडी ३, कºहाड विकास आघाडी ३ आणि पाटण विकास आघाडी १ असे बलाबल राहिलंय. भाजपचे सदस्य राहिलेले दीपक पवार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त राहिले आहे. त्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांसाठी आरक्षण हे सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)साठी आरक्षित होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष असणारे संजीवराजे नाईक-निंबाळकर, कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मानसिंगराव जगदाळे व सध्याचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे दावेदार होते; पण यात संजीवराजे आणि जगदाळे यांचेच पारडे जड होते. शेवटी संजीवराजे यांनाच अध्यक्षपदाची लॉटरी लागली. आताही पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारणसाठी पडले आहे. त्यामुळे बहुमत असणाऱ्या राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. विद्यमान अध्यक्ष संजीवराजे यांनाच पुन्हा संधी मिळेल, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. कारण गेल्या अडीच वर्षांत संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक होईल असेच काम करून दाखविले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते; पण एका व्यक्तीलाच पुन्हा संधी नको म्हणून कदाचित त्यांचा विचार होणार नाही, तर मागील दावेदार मानसिंगराव जगदाळे यांच्यासाठी नशिबाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. यावेळी आरक्षण दुसरे काही पडले असते तर जगदाळे यांना नक्कीच उपाध्यक्षपद मिळणार होते; पण सर्वसाधारण आरक्षणाने जगदाळे यांच्यासाठी अध्यक्षपद खुणावू लागले आहे. त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटीलही जोरदार प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मागे संधी हुकली म्हणून पक्षश्रेष्ठीही निष्ठावंत राहिलेल्या जगदाळे यांची वर्णी अध्यक्षपदावर लावू शकतात, असेच चित्र आहे.