शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल कंपन्यांचे एजंट होण्यास तयार

By admin | Updated: June 23, 2017 04:22 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बदलणाऱ्या किमतीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. त्या प्रमाणे त्याचे दरही बदलते असावेत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बदलणाऱ्या किमतीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. त्या प्रमाणे त्याचे दरही बदलते असावेत, याच भूमिकेतून या पूर्वी वर्षातून अनेकदा आणि आता दररोज दर बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दररोज बदलत जाणाऱ्या या भावाची अंमलबजावणी कशी करायची, असा मोठा प्रश्न पेट्रोल पंपचालकांसमोर आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आज देशातील अत्यंत थोड्या पेट्रोलपंपांवर अत्याधुनिक यंत्रणा आहे. आधीच थोड्या असलेल्या या अत्याधुनिक पंपांचे प्रमाण शहरी भागातच तुलनेने अधिक आहे. ही आधुनिक म्हणवली जाणारी यंत्रणा देखील आता कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे या बदलाला पेट्रोलपंप कसे सामोरे जातील. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव बदलणार. आत्ताच्या पारंपरिक पद्धतीने पंपचालक संबंधित कंपनीकडून टँकरद्वारे पेट्रोल-डिझेल आणतो. त्यासाठी पैसेदेखील तो त्या पूर्वीच भरतो. जर आज आणलेल्या टँकरमधील काही लिटर इंधन शिल्लक राहिल्यास दुसऱ्या दिवशी काय करायचे, त्याची किंमत कमी-अधिक असल्यास त्याची जोखीम कोणी पत्करायची. या मुळे आधीच अडचणीत असणाऱ्या पेट्रोल पंपांसमोरील अडचणीत वाढच होईल. आदल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असतील, दुसऱ्या दिवशी त्यात घट झाल्यास शिल्लक इंधनाचा भुर्दंड कोणाच्या माथी पडणार? हा खरा सवाल आहे. अनेक पेट्रोल पंपचालकांना दोन अथवा तीन पाळ्यांमध्ये सेवा द्यावी लागते. त्या नुसार कर्मचाऱ्यांची संख्या कमी-जास्त होते. किमान वेतनानुसार या सर्वांचे वेतन आणि देखभाल खर्चदेखील पंपचालकांना उचलावा लागतो. यात काही लाख रुपये खर्ची पडतात. या निर्णयामुळे पेट्रोलपंपचालक आणखी अडचणीत येतील.अजून आपला देश संपूर्ण स्वयंचलित पेट्रोलपंप या संकल्पनेपर्यंत पोहोचलेला नाही. त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. कारण तशा तंत्रज्ञानाची उपलब्धता आपल्याकडे नाही. परदेशात वाहनमालकालाच पेट्रोल भरणे आणि त्याचे पैसे अदा करणे अशी सर्व कामे करावी लागतात. आज आपल्याकडे ही कामे कामगारांकडूनच केली जातात. या शिवाय गाडीच्या चाकात हवा भरणे, चारचाकी वाहनांच्या काचा साफ करून देण्याची सेवादेखील दिली जाते. नवीन बदल स्वीकारायला पेट्रोल पंप चालकांची ना अजिबात नाही. मात्र, त्यासाठीची सक्षम यंत्रणा पेट्रोलियम कंपन्यांनी उभारली पाहिजे. अगदी पेट्रोल पंपचालक ‘मध्यस्थाची’ (एजंट) भूमिका देखील पार पाडायला तयार आहे. कंपन्यांनी स्वयंचलित यंत्रणा प्रत्येक पंपावर बसवावी. त्यानुसार दररोजच्या पेट्रोल-डिझेलच्या बदलणाऱ्या किमती बदलाव्यात. त्या बदल्यात योग्य मोबदला (कमिशन) पेट्रोल पंपचालकांना दिला जावा. हा बदल होईपर्यंत दररोज इंधनाच्या रक्कम बदलण्याचा निर्णय व्यवहार्य होणार नाही. ग्रामीण भागात असा दर बदलणे अधिकच अडचणीचे होईल. अनेक ठिकाणी मोबाईलला देखील रेंज नसते, अशा ठिकाणी मग काय करणार? तरीही सरकारला हा निर्णय राबवायचा असल्यास आमची पेट्रोल-डिझेल वितरण करायची तयारी आहे. त्यांनी वितरण होणाऱ्या इंधनाचे पैसे द्यावे आणि शिल्लक राहणाऱ्या इंधनाची जबाबदारी स्वीकारावी. देशात सुमारे ९० हजार पेट्रोलपंप आहेत. या निर्णयामुळे येथील व्यवहारच विस्कळीत होण्याचा धोका आहे. या सर्व बाबी संघटना म्हणून पेट्रोलियम मंत्रालय आणि पेट्रोलियम कंपन्यांकडेदेखील मांडणार आहोत.