'तारक मेहता'मधील पोपटलालला एक चूकीमुळे दाखवला होता बाहेरचा रस्ता, निर्मात्याची माफी मागितल्यानंतर झाली पुन्हा एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 12:00 PM2020-10-06T12:00:00+5:302020-10-06T12:20:50+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिकेत सध्या नवे एपिसोडसोबत नव्या कलाकारांची झालेल्या एंट्रीला घेऊन चर्चेत आहे.गोकुळधामवासी लोकांचे भरपूर मनोरंजन करतायेत. तारका मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे प्रचंड फॅनफोलॉईंग आहे. यामालिकेत पोपटलालची भूमिका साकारत असलेल्या श्याम पाठकला एकेकाळी मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होते. मीडिया रिपोर्टनुसार यात श्याम पाठकची चूक होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरू झाल्यापासूनच श्याम पाठक या मालिकेचा भाग आहे. श्याम या मालिकेत पत्रकार पोपटलालची भूमिका साकारतो ज्याचे अद्याप लग्न झालेले नाही.

काहीवर्षांपूर्वी पोपटलालला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 2017मध्ये या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत असलेल्या दिलीप जोशींना लंडनला एक लाइव्ह शो साठी गेले होते. लंडनला जायचे याबाबत त्याला खूप दिवस आधीपासून कल्पना असल्याने त्याने याबाबात प्रोडक्शन हाऊसकडून परवानगी घेतली होती. जेठालालसोबत पोपटलालने देखील लंडनमध्ये परफॉर्म करावे असे आयोजकांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी दिलीप जोशीला याबाबत विनंती केली.

दिलीप जोशी यांनी श्याम पाठकला विचारल्यावर तो देखील तयार झाला. पोपटलालकडे खूपच कमी वेळ असल्याने प्रोडक्शन हाऊसला काहीही न कळवता तो लंडनला रवाना झाला.

श्याम पाठक परदेशात असल्याने त्याच्यासोबत काहीही संपर्क देखील होत नव्हता. त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण खोळंबले होते.

श्याम पाठक परत आल्यावर याबाबत त्याला विचारण्यात आले असता चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि असित मोदींनी श्यामला मालिका सोडायला सांगितले. 4 दिवस पोपटलालला मालिकेचे शूटिंग करु दिले नव्हते.

यानंतर श्यामने मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माता असित मोदी यांची माफी मागितली त्यानंतर त्याला पुन्हा शूटिंग करण्यासाठी परवानगी देण्यात आली.