श्वेता तिवारीची लेक पलक स्वतःला मानत नाही स्टार किड, नेपोटिझमवर व्यक्त केले मत, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:09 PM2021-08-28T22:09:25+5:302021-08-28T22:09:25+5:30

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले.

पलक तिवारी रोजी द सॅफरन चॅप्टरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात विवेक ऑबेरॉय मुख्य भूमिकेत आहे.

विशाल मिश्रा द्वारा दिग्दर्शित हॉरर थ्रिलर असलेला चित्रपट सत्य घटनेने प्रेरीत असल्याचे सांगण्यात येते.

गुरूग्रामची महिला बीपीओ कर्मचारी रोजी अचानक गायब होते, यावर आधारीत आहे.

पलक तिवारी म्हणाली की, मी खरे सांगू तर मी स्वतःला स्टार किड मानत नाही. माझी आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने खुलासा केला की, तिच्याकडेदेखील आताही बरेच बेनिफिट ऑप्शन आहे.

२१ वर्षीय पलक तिवारीने नुकतेच स्पॉटबॉयशी केलेल्या बातचीतमध्ये नेपोटिझमच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले .

तुम्हाला तुमच्या बेस्ट कॉन्टॅक्टवर एक किंवा दोन चित्रपटात काम करण्याची संधी मिळते पण ५ किंवा ६व्या चित्रपटात फायनॅंशियल परिस्थिती पहावी लागते.