PHOTOS: बाथटबवर बसून श्वेता तिवारीने केलं ग्लॅमरस फोटोशूट, पर्सनल लाईफमुळे असते सतत चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:28 PM2021-03-03T13:28:54+5:302021-03-03T13:28:54+5:30

‘प्रेरणा’ या नावाने घराघरात लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram)

श्वेताने तिचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram)

2001 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने श्वेताला खरी ओळख दिली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

2004 मध्ये बॉलिवूडमध्येही तिने पदार्पण केले. त्यावर्षी बिपाशा बासू स्टारर ‘मदहोशी’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा. (Photo Instagram)

यानंतर आबरा का डाबरा, मिले ना मिले हम या चित्रपटांतही ती झळकली. याशिवाय अनेक भोजपुरी सिनेमांतही तिने काम केले. (Photo Instagram)

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)

त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्न केले मात्र तिचे हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही. (Photo Instagram)

राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. (Photo Instagram)