IN PICS: पती शार्दुलला लठ्ठ अन् घटस्फोटित म्हणत नेहाला डिवचलं, अभिनेत्रीनं ट्रोलर्संना चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:00 AM2021-03-24T07:00:00+5:302021-03-24T07:00:02+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे आजकाल बरीच चर्चेत आहे. लोकप्रिय टीव्ही शो 'भाभीजी घर पर है' मध्ये नेहाने गोरी मेमची भूमिका साकारणारी सौम्या टंडनची जागा घेतली आहे. (Photo Instagram)

सध्या नेहा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. शार्दुल ब्याससोबत लग्नबेडीत अडकली होती.. शार्दुलच्या लठ्ठपणा आणि घटस्फोटामुळे नेहा खूप ट्रोल होते. नेहाने ट्रॉलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. (Photo Instagram)

काहीजण त्या जाड म्हणत आहेत तर काहीजण घटस्फोटीत म्हणून खिल्ली उडवतात. ज्याचे नेहाने योग्य उत्तर दिले आहे. (Photo Instagram)

शार्दुलचे हे तिसरं लग्न आहे आणि त्याला दोन्ही लग्नातून एक एक मुले आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या कालावधीपासून नेहा पेंडसेच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. या सर्व गोष्टींना नेहाने प्रत्युत्तर दिले असून ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. (Photo Instagram)

एका मुलाखती दरम्यान नेहा म्हणाली की, 'हे तेच लोक आहेत जे माझा द्वेष करतात कारण मी करत असलेले काम त्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. शार्दुलची दोन लग्न झाले आहेत. परंतु त्यांनी माझ्यापासून काहीही लपवले नाही आणि मला काही फरक पडत नाही. (Photo Instagram)

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी शिवाय हिंदी मालिका व चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

मराठीबरोबरच हिंदीमध्ये 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती. (Photo Instagram)

नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)