गायत्री दातारची चर्चा ! आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष,फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 07:26 PM2020-12-23T19:26:32+5:302020-12-23T19:31:58+5:30

छोट्या पडद्यावर 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्रीला तर तुफान पसंती मिळाली होती.

सोशल मीडियावर गायत्री दातार नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात. नुकताच गायत्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत गायत्रीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत ती अधिक सजग झाली आहे.

गायत्रीचे हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

शेअर केलेल्या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन निरागस दिसणारी गायत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही तिच्या या लूकवर फिदा होत आहेत.

तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

गायत्रीने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाइलने रसिकांवर मोहिनी घालण्यास सुरूवात केली आहे.

गायत्री दातारचे ब्लॅक इन ब्युटी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.