मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:44 PM2021-07-15T16:44:56+5:302021-07-15T16:49:43+5:30

Mayuri Deshmukh : ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो पाहाल तर पाहातच राहाल.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचे हे सुंदर फोटो पाहाल तर पाहातच राहाल.

होय, मयुरीनं इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंवर चाहते फिदा आहेत.

होय, गुलाबी रंगाचं सॅटिनचं शर्ट, पॅन्ट, मोकळे केस आणि चेह-यावरच मनमोहक हास्य अगदी वेड लावणारं आहे.

या फोटोतील मयुरीची प्रत्येक अदा खल्लास करणारी आहे.

मयुरी इमली या मालिकेत सध्या काम करत असून तिच्या कामाचे चांगलेच कौतुक होत आहे.

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईलसाठी मयुरी ओळखली जाते.

खुलता कळी खुलेना या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती.

त्यानंतर लग्नकल्लोळ या सिनेमातही ती झळकली होती. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.