अब्जो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे विल स्मिथ, ७ स्टार हॉटेलपेक्षाही भारी आहे त्यांचं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:14 PM2022-03-28T17:14:34+5:302022-03-28T17:21:51+5:30

Will Smith Net Worth: विल स्मिथ १८ वर्षांचा असताना त्याच्या एका अल्बममुळे कोट्याधीश बनला होता. आज आम्ही तुम्हाला सांगतोय की विल स्मिथकडे किती संपत्ती आहे आणि तो कसं जीवन जगतो.

विल स्मिथ एक हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि रॅपर आहे. जगातल्या सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचं नाव येतं. त्याचा अभिनय सर्वांनाच आवडतो. नुकताच त्याला ९४वा अकॅडमी अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर देण्यात आला. विल स्मिथ १८ वर्षांचा असताना त्याच्या एका अल्बममुळे कोट्याधीश बनला होता. आज आम्ही तुम्हाला सांगतोय की विल स्मिथकडे किती संपत्ती आहे आणि तो कसं जीवन जगतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विल स्मिथची एकूण संपत्ती ३५० मिलियन डॉलर म्हणजे साधारण २७ अब्ज इतकी आहे. सिनेमा, गुंतवणूक आणि जाहिरातींच्या माध्यमातून स्मिथ दरवर्षी साधारण ४० मिलियन डॉलरची कमाई तर करतोच. जून २०१९ आणि २०२० दरम्यान विल स्मिथने केवळ सिनेमांच्या माध्यमातून ४५ मिलियन डॉलरची कमाई केली होती.

आपल्या करिअरच्या शिखरावर असताना विल त्याच्या प्रत्येक सिनेमातून २० ते ३० मिलियन डॉलरपर्यंतची कमाई केली होती. २०१७ मध्ये त्याला केवळ नेटफ्लिक्सवर आपला सिनेमा ब्राइटसाठी २० मिलियन डॉलर आणि त्याच्या सीक्वलसाठी साधारण ३५ मिलियन डॉलर मिळाले होते.

विल सोशल मीडियावरही सुपरस्टार आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे ४५ मिलियनपेक्षा जास्त, यूट्यूबवर ८ मिलियनपेक्षा जास्क फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विल खूप कमाई करतो.

१९९९ मध्ये विल आणि जॅडाने कॅलिफोर्नियाच्या मालिबू आणि कैलाबासमध्ये डोंगरात १०० एकरची प्रॉपर्टी ७.५ मिलियन डॉलरला खरेदी केली होती. २००० मध्ये त्याने २० हजार स्क्वेअर फूटाचं घर, काही गेस्ट हाऊस, एक खाजगी तलाव, तबेला, टेनिस कोर्ट आणि बरंच काही खरेदी केलं. त्याने २०१५ मध्ये १० मिलियन डॉलरमध्ये मल्टी होम प्रॉपर्टी खरेदी केली होती. विलच्या घरात सर्व अत्याधुनिक सुखसुविधा आहेत.

सप्टेंबर २०२१ मध्ये विल आणि जॅडाने कॅलिफोर्नियाच्या हिडन हिल्समध्ये १०,४०० वर्ग मीटर फूट घरासाठी ११ मिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च केला होता. विल स्मिथकडे कमीत कमी १०० मिलियन डॉलरची अचल संपत्ती आहे. विलकडे लक्झरी शूजचं कलेक्शनही आहे. ज्यांची किंमत लाखो रूपये आहे.

विलकडे २२ चाकं असलेली कार लक्झरी मोटर होम आहे. हे वाहन आपल्या डिझाइनसाठी आणि लक्झरी सुविधांसाठी ओळखलं जातं. हे चालतं-फिरतं डबल डेकर होम आहे जे १२०० स्क्वेअर फूटात तयार करण्यात आलं आहे. यासाठी १८.६७ कोटी रूपये खर्च आला. आपल्या शूटिंगवेळी विल यातच राहणं पसंत करतो.