IN PICS : मनोरंजनाची मेजवानी! 2021 मध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 08:00 AM2020-12-31T08:00:00+5:302020-12-31T08:00:01+5:30

2021 या नव्या वर्षांत अनेक मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. त्यावर एक नजर

नेल पॉलिश - अर्जुन रामपालची मुख्य भूमिका असलेला क्राईम-थ्रीलर सिनेमा 1 जानेवारीला झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. यात अर्जुनशिवाय मानव कौल, आनंद तिवारी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

रामप्रसाद की तेरहवीं - सीमा पहवा दिग्दर्शित हा कॉमेडी सिनेमा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी चित्रपटगृहांत रिलीज होतोय. यात नसीरूद्दीन शाह, विनय पाठक, विक्रांत मेस्सी, कोंकणा सेन शर्मा, विनीत कुमार आदींच्या भूमिका आहेत.

कागज - पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला आणि सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नव्या वर्षात झी-5 वर रिलीज होतोय. सलमान खानच्या प्रॉडक्शनच्या या सिनेमात मोनल गज्जर, अमर उपाध्याय,टीना अहुजा सारखे कलाकार आहेत.

12'O' Clock - राम गोपाल वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा 8 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय. यात मिथुन चक्रवर्ती,मकरंद देशपांडे, फ्लोरा सैनी, मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत.

हाती मेरे साथी - एकाचवेळी अनेक भाषांमध्ये तयार होत असलेला हा सिनेमा जानेवारीतच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात राणा दग्गुबती, विनीत विशाल, पुलकित सम्राट, जोया हुसैन आदी कलाकार आहेत.

अतरंगी रे - आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा फेब्रुवारीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अक्षय कुमार, धनुष, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

लाल सिंह चढ्ढा -बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा आपला आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटात करिना कपूरही मुख्य भूमिकेत आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बेल बॉटम - अक्षय कुमार नवीन वर्षात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तो त्याचा दूसरा एक नवीन ‘बेल बॉटम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित करणार आहे. 2 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता दिसणार आहेत.

मैदान - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा आगामी ‘मैदान’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजयशिवाय, प्रियामणी, गजराज राव तसेच रूद्रनिल घोष यासारखे कलाकार आहेत.

रक्षाबंधन - अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रक्षाबंधन’ असे या चित्रपटाचे नाव आहे.5 नोव्हेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

आरआरआर - ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर एस. एस. राजामौली ‘आरआरआर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवली जाणार आहे. यात जुनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हीरोपंती 2 - टायगर श्रॉफचा आगामी ‘हीरोपंती 2’ हा चित्रपटसुद्धा पुढच्या वर्षी 16 जुलै 2021रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत तारा सुतारिया दिसणार आहे.

Read in English