IN PICS : इतक्या कोटींचा संपत्तीचा मालक आहे साऊथ सुपरस्टार विजय, जगतो अलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:11 AM2021-06-22T11:11:18+5:302021-06-22T11:19:26+5:30

Vijay Birthday Special : साऊथचा सुपरस्टार थलापती विजय याचा आज वाढदिवस. तामिळ फिल्म इंडस्ट्रीतला सर्वाधिक महागडा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो.

साऊथचा सुपरस्टार थलापती विजय याचा आज वाढदिवस. आज विजय साऊथ सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. तामिळ फिल्म इंडस्ट्रीतला सर्वाधिक महागडा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो.

आगामी ‘बीस्ट’ या सिनेमासाठी विजयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. अगदी मानधनाच्या बाबतीत त्याने महानायक रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. कारण आत्तापर्यंत फक्त रजनीकांत यांनीचं आपल्या ‘दरबार’ या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये घेतले आहेत.

थलपती विजय अभिनेता असण्यासोबतच एक डान्सर आणि सिंगरही आहे. अनेक मोठ्या ब्रँडसाठी तो जाहिराती करतो. या जाहिरातीतून वर्षाकाठी तो 10 कोटींची कमाई करतो.

एका रिपोर्टनुसार, विजयचे वार्षिक उत्पन्न 100 ते 120 कोटी आहे. यात चित्रपटांपासून तर जाहिरातींमधून होणारी कमाई सामील आहे.

विजयकडे 410 कोटींची संपत्ती असल्याचे कळते. चेन्नईत एका अलिशान बंगल्यात तो राहतो.

विजयला अलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Rolls Royce Ghost ही अलिशान गाडी आहे. या एका गाडीची किंमत 6 कोटी आहे. याशिवाय आॅडी ए 8, बीएमडब्ल्यू एक्स 6. बीएमडब्ल्यू सीरिज 5 आणि मिनी कूपर अशा महागड्या गाड्या त्याच्या दिमतीला आहे.

विजयची लव्हस्टोरीही खास आहे. विजयने आपल्या एका चाहतीसोबत सोबत लग्न केलं आहे. त्याच्या पत्नीचं नाव संगीता आहे. संगीता ही युकेमध्ये राहत होती. आणि ती विजयची मोठी चाहती होती.

संगीताने विजयला त्याच्या सेटवर जाऊन आपण त्याची मोठी चाहती असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरु झाला आणि या दोघांनी 1999 मध्ये लग्नसुद्धा केलं. या दोघांना 2 आपत्येसुद्धा आहेत.

टॅग्स :TollywoodTollywood