सारासोबत ३ दिवस बॅंकॉकच्या हॉटेलमध्ये होता सुशांत - साबिर अहमद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 10:10 AM2020-08-29T10:10:29+5:302020-08-29T10:34:43+5:30

रिया म्हणाली की, सुशांत त्याच्या मित्रांसोबत एका बॅंकॉक ट्रिपला गेला होता. आता याबाबत सुशांतचा स्टाफ साबिर अहमद याने आजतकला सांगितले.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. आजतकला रियाने दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडण्याचा तिने प्रयत्न केला. रियाने सुशांतसोबत यूरोप ट्रिपवर जाण्याबाबतची पूर्ण कहाणी सांगितली. सोबतच ती म्हणाली की, सुशांत त्याच्या मित्रांसोबत एका बॅंकॉक ट्रिपला गेला होता. आता याबाबत सुशांतचा स्टाफ साबिर अहमद याने आजतकला सांगितले. (All Images Credit : Google.com)

साबिरने सांगितले की, बॅंकॉकच्या या ट्रिपमध्ये सहभागी होता. ही फारच लक्झुरिअस ट्रिप होती. या ट्रिपवर त्यांच्यासोबत कोण होतं आणि तिथे काय झालं हे सगळंच साबिरने सांगितले. त्याने हेही सांगितले की, बॅंकॉक ट्रिप काही कारणाने अर्धवट सोडावी लागली होती.

साबिरनुसार, या ट्रिपवर सात लोक होते सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल जावेरी, अब्बास, सुशांतचा बॉडी गार्ड मुस्ताक आणि स्वत: साबिर अमहद.

ही सुशांतकडून त्याच्या पीआरओ टीममधील सदस्यांना आणि अभिनेत्री सारा अली खानसोबत एक ट्रिप होती. ज्यात सुशांतच्या स्टाफमधील दोन लोक होते.

२०१८ च्या डिसेंबर महिन्यात हे सगळे लोक बॅंकॉकच्या ट्रिपवर एका प्रायव्हेट जेटने गेले होते. ट्रिपबाबत साबिर अहमदने सांगितले की, तो तीन दिवसांसाठी सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खानसोबत एका हॉटेलमध्ये होते.

ट्रिपच्या पहिल्या दिवशी सगळेच बीचवर गेले होते. त्यानंतर सुशांतचे बाकीचे मित्र बॅंकॉक फिरत होते आणि सुशांत-सारा हॉटेलमधेच होते.

सर्वच लोक बॅकॉकमधील आयलॅंड हॉटेलमध्ये थांबले होते. ही एक आलिशान ट्रिप होती. पण त्सुनामीमुळे ही ट्रिप अर्धवट सोडावी लागली होती. सर्वांना मुंबईला परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. पण साबिर आणि मुस्ताकला बॅंकॉकमधेच थांबावं लागलं होतं. कारण परत येण्यासाठी फ्लाइटची पूर्ण तिकीटे मिळाली नव्हती.

सर्वच लोक बॅकॉकमधील आयलॅंड हॉटेलमध्ये थांबले होते. ही एक आलिशान ट्रिप होती. पण त्सुनामीमुळे ही ट्रिप अर्धवट सोडावी लागली होती. सर्वांना मुंबईला परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. पण साबिर आणि मुस्ताकला बॅंकॉकमधेच थांबावं लागलं होतं. कारण परत येण्यासाठी फ्लाइटची पूर्ण तिकीटे मिळाली नव्हती.

त्सुनामीमुळे साबिर आणि मुस्ताक एक महिन्यासाठी बॅंकॉकमध्ये राहिले. सुशांत राहण्यासाठी आणि खर्च उचलण्यासाठी आपलं एटीएम कार्ड त्यांच्याकडे दिलं होतं. नंतर सॅम्युअलने मुंबईहूनही पैसे पाठवले होते. मुंबईला परत आल्यावर सॅम्युअल त्या दोघांना घेण्यासाठी एअरपोर्टवरही गेला होता.

दरम्यान या ट्रिपबाबत रिया चक्रवर्तीने मुलाखतीत सांगितले की, माझ्याआधीही एक - दोन वर्षांआधी तो ६ मुलांसोबत थायलॅंडला गेला होता. त्याने या ट्रिपवर सुशांतने जवळपास ७० लाख रूपये खर्च केले होते.

त्याने या ट्रिपसाठी प्रायव्हेट जेट केलं होतं. हीच त्याची लाइफस्टाईल होती. त्याने काय करावं हे त्यालं सांगणारं कोण? त्याची मर्जी. तो एका स्टारसारखा किंगसारखा जगत होता. त्याला या गोष्टी आवडत होत्या.

Read in English