रामचरणपासून ते विजयपर्यंत, साऊथ सिनेमातील सुपरस्टार 'या' साइड बिझनेसमधून करतात कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:09 PM2022-01-21T15:09:20+5:302022-01-21T15:27:12+5:30

South Star's Side Business : या स्टार्समध्ये पॉप्युलर कलाकार होण्यासोबतच पॅशनही असतं. जे अभिनयापेक्षा वेगळं असतं. साऊथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे सिनेमात काम करण्यासोबत साइड बिझनेसही करतात.

साऊथ इंडियन कलाकारांचं त्यांच्या कामामुळे चांगलंच कौतुक होतं. जगभरात त्यांचे लाखो फॅन्स आहेत. मात्र, या स्टार्समध्ये पॉप्युलर कलाकार होण्यासोबतच पॅशनही असतं. जे अभिनयापेक्षा वेगळं असतं. साऊथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे सिनेमात काम करण्यासोबत साइड बिझनेसही करतात.

श्रुति हासन - श्रुति हसन एका प्रॉ़डक्शन हाऊसची मालक आहे. ISIDRO असं या कंपनीचं नाव आहे. ISIDRO अॅनिमेशन, शॉर्ट फिल्म्स आणि व्हिडीओ रेकॉर्डींगची काम केली जातात. श्रुतिने ट्विटरवरून याची माहिती दिली होती.

तापसी पन्नू - नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री 'द वेडिंग फॅक्ट्री' नावाने एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. ही कंपनी लग्न आणि वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाइज करते. ती तिची बहीण शगुन पन्नू आणि मैत्रीण फराह परवरेशसोबत ही कंपनी मॅनेज करते.

नागार्जुन - नागार्जुनचे अनेक साइड बिझनेस आहेत. एल-ग्रिल आणि एन एशियन नावाच्या रेस्टॉरन्टचे मालक असण्यासोबत नागार्जुनके एक कन्व्हेंशन सेंटरही आहे. जे कॉर्पोरेट हाऊसेसना नेहमी भाड्याने दिलं जातं.

विजय - तमिळ सिनेमाचा सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता विजयचे अनेक साइड बिझनेस आहेत. त्याचे चेन्नईमध्ये अनेक वेडींग हॉल्स आहेत. त्याची आणखी एक खासियत म्हणजे तो एक बिझनेसमन आणि अभिनेता असण्यासोबत एक Philanthropist आहे.

राम चरण - राम चरण तेजा एक इंडियन अभिनेता, निर्माता आणि बिझनेसमन आहे. तो ट्रूजेट नावाच्या हैद्राबादमधील एअरलाइन्सचा मालक आहे. सोबच हैद्राबादची पोलो टीम आणि रायडिंग क्लबचाही मालक आहे. त्याने 'द कोनिडेला प्रोडक्शन कंपनी' ही सुरू केली आहे.

तमन्ना भाटिया - तेलुगु सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. व्हाइट अॅन्ड गोल्ड नावाच्या एका ऑनलाइन ज्वेलरी ब्रॅन्डची मालक आहे.

आर्या - आर्या सी शेल नावाच्या एका साऊथ इंडियन रेस्टॉरन्टचा मालक आहे. तसेच द शो पीपल नावाची एक प्रॉडक्शन कंपनी देखील आहे.