OMG! श्रद्धा कपूरने पापाकडे मागितले खास बर्थ डे गिफ्ट, ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 12:11 PM2021-03-03T12:11:36+5:302021-03-03T12:23:08+5:30

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रद्धांचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चुलत भावाच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी मालदीवमध्ये मुक्कामाला आहे.

मालदीवमध्येच श्रद्धाचा 34 वा वाढदिवस साजरा होतोय. आज श्रद्धा तिचा वाढदिवस साजरा करतेय.

आता वाढदिवस म्हटल्यानंतर गिफ्ट तर हवे. तर या वाढदिवसाला श्रद्धाने पापा शक्ती कपूर यांच्याकडे एक खास गिफ्ट मागितले आहे.

खुद्द शक्ती कपूर यांनी हा खुलासा केला. सोबत, लेकीला हे गिफ्ट देऊ शकेल की नाही, याबाबत शंकाही व्यक्त केली.

तर शक्ती कपूर यांना धुम्रपानाचे व्यसन आहे. हे व्यसन त्यांनी सोडावे,अशी श्रद्धाची इच्छा आहे. तिला पापाकडून हेच गिफ्ट हवे आहे.

लेकीसाठी काही पण, हीच शक्ती कपूर यांची भावना आहे. पण सोबतच गेल्या कित्येक वर्षांचे व्यसन एका झटक्यात सोडणे शक्य होईल का याबाबत शक्ती कपूर यांच्या मनात शंकाही आहे.

पण तरीही श्रद्धासाठी आपण स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्रद्धा माझी लाडकी लेक आहे. ती देवाने मला दिलेली सुंदर भेट आहे. तिचे मन सोन्याचे आहे. तिच्यासारखी मुलगी मला मिळाली, यातच मी धन्य झालो, अशी भावनाही शक्ती कपूर यांनी व्यक्त केली.

माझी मुलगी तिच्या लाईफमध्ये सेटल व्हावी, ही माझी इच्छा आहे. आमच्या काळात लोक 20 वर्षांतच लग्न करत. पण आता काळ बदललाये. मला याबद्दल काहीही तक्रार नाही. तिच्या सर्व निर्णयाला माझा पाठींबा आहे, असेही शक्ती कपूर म्हणाले.