प्रियंका चोप्रानं शेअर केला जिचा फोटो, कोण आहे ती मानसा? सगळीकडेच होतीये तिची चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:10 PM2021-12-03T13:10:38+5:302021-12-03T13:18:38+5:30

माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री प्रियंका चोप्रानं गुरूवारी इन्स्टाग्रामवर मानसा वाराणसीच्या नावे एक स्टोरी शेअर करत तिला शुभेच्छा दिल्यात. साहजिकच, प्रियंकाच्या या पोस्टनंतर मानसा अचानक चर्चेत आली.

माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री प्रियंका चोप्रानं गुरूवारी इन्स्टाग्रामवर मानसा वाराणसीच्या नावे एक स्टोरी शेअर करत तिला शुभेच्छा दिल्यात. साहजिकच, प्रियंकाच्या या पोस्टनंतर मानसा अचानक चर्चेत आली.

मानसा यावर्षी ‘मिस वर्ल्ड 2021’ या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतेय. या स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. प्रियंकाने या स्पर्धेसाठी मानसाला शुभेच्छा देत, तिला पाठींबा देण्याचं आवाहन केलं आहे.

येत्या 16 डिसेंबरला सॅन जुआन, प्युर्टो रिको येथे ‘मिस वर्ल्ड 2021’ सोहळा रंगणार आहे. मानसाने यावर्षाच्या सुरूवातीला ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020’चा किताब जिंकला होता.

‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब जिंकणारी आणि ‘मिस वर्ल्ड 2021’ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असणारी मानसा केवळ 23 वर्षांची आहे.

मानसा वाराणसी ही तेलंगणाची आहे. हैदराबादेत राहणा-या मानसाने याआधी ‘मिस तेलंगणा’ हा किताब जिंकला होता.

मानसा ही इंजिनिअर आहे. वसवी कॉलेजातून तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

पेशाने ती फायनान्शिअल एक्सचेंज इन्फॉर्मेशन अ‍ॅनालिस्ट आहे. वाचन, गाणी ऐकणे, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत.

कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणा-या मानसाने 8 वर्षे भरतनाट्यम शिकलं आहे. चार वर्षे संगीताचे धडे गिरवले आहेत.

Read in English