आलीशान बंगल्यांव्यतिरिक्त अनेक हॉटेल्सचेही मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, संपत्तीचा आकडाही आहे मोठा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:33 PM2020-12-22T12:33:13+5:302020-12-22T12:40:31+5:30

एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली.

मिथुन चक्रवर्ती गेली 40 वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत आहे, कोलकाता येथे 16 जून 1950 रोजी जन्मलेल्या मिथुन यांचे खरे नाव गौरंग चक्रवर्ती आहे. .

मिथून यांचा मुंबईशिवाय ऊटी येथे आलिशान बंगला आहे.मीडिया रिपोर्टनुसार जवळपास 258 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या मुंबईतील घरात जवळपास ३८ कुत्रे त्यांनी पाळले असून उटीच्या बंगल्या ७६ पाळीव कुत्रे आहेत.

मिथुन ग्रुप ऑफ होटल्स मोनार्कच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध असणा-या माहितीनुसार ऊटीमधील हॉटेलमध्ये 59 रूम, 4 लग्जरी फर्निश्ड सुइट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेजर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ ब्वॉय बार एंड डिस्कोसह, किड्स कॉर्नर सारख्या सुविधा आहेत.

मोनार्क सफारी पार्क मसिनागुड़ीमध्ये 16 बंगले, 14 ट्विन्स मचान, 4 स्टँडर्ड रूम, मल्टीकुजीन रेस्टोरेंट आणि चिल्ड्रन प्ले ग्राउंडसह घोडेस्वारी करण्याची सोय, जीपमधून जंगल सफारी सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

मैसूरमधील हॉटलमध्ये 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ओपन एयर मल्टीकुजीन रेस्टोरेंटसह भलामोठा स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रेवलसंबंधीत सुविधाही पुरवल्या जातात.

मिथुनदा लक्झरीयस गाड्यांचेही शौकीन आहेत. महागड्या गाड्यांचे त्यांच्याकडे कलेक्शन आहे. यांत फॉक्सवैगन, फोर्ड एंडेवर आणि टोयोटा फॉर्च्यूनर 1975 मॉडल मर्सिडीज बेंजचाही समावेश आहे. मिथुनदाकजे फॉक्सवैगन 1975 मॉडल कारही आहे.

मिथुन यांची फिल्मी करियरची सुरूवात 1976 मध्ये प्रदर्शित झालेली 'मृगया' पासून झाली होती.आपल्या दमदार एक्टिंगमुळे सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर मिथुन यांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांनी आता पर्यंत 350 हून अधिक सिनेमात काम केले आहे. या वयातही ते सिनेमात काम करत आहेत.

'वारदात', 'अविनाश', 'जाल', 'डिस्को डांसर', 'भ्रष्टाचार', 'घर एक मंदिर', 'वतन के रखवाले', 'हमसे बढ़कर कौन', 'चरणों की सौगंध', 'हमसे है जमाना', 'बॉक्सर', 'बाजी', 'कसम पैदा करने वाले की', 'प्यार झुकता नहीं', 'करिश्मा कुदरत का', 'स्वर्ग से सुंदर' सिनेमे आजही रसिक तितकेच आवडीने पाहातात.