या अभिनेत्रींचे होते क्रिकेटरसोबत अफेअर, पाचवी जोडी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:04 PM2020-04-11T15:04:47+5:302020-04-11T15:26:06+5:30

अमृता अरोराने शकील लडाक या बिझनेसमनसोबत लग्न केले आहे. पण त्याआधी तिचे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर उस्मान अफजलसोबत अफेअर होते.

जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्यांचे लग्न व्हायच्याआधी जहीर इशा शर्वणीसोबत नात्यात होता. त्यांचे अफेअर जवळजवळ आठ वर्षं सुरू होते.

अमृता सिंग आणि रवी शास्त्री यांच्या अफेअरची चर्चा ऐंशीच्या दशकात रंगली होती. त्यांनी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी एकत्र शूट देखील केले होते.

युवराज सिंगचे हेजल कीचसोबत लग्न झाले असून त्याआधी त्याचे अभिनेत्री कीम शर्मा आणि दीपिका पादुकोणसोबतचे अफेअर चांगलेच गाजले होते.

सौरभ गांगुली आणि नगमा यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी मीडियात चांगलीच गाजली होती. त्यावेळी सौरभचे लग्न देखील झाले होते.

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्डस यांचे अफेअर चांगलेच गाजले होते. नीनाने सिंगल मदर बनून विवियनच्या मुलीला जन्म देखील दिला आहे.

सोफिया हयात काही वर्षांपूर्वी रोहित शर्माला डेट करत होती असे तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते.