कंगना रानौतने शेअर केले थ्रोबॅक फोटो, 12 वर्षे जुन्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:56 PM2020-04-27T18:56:45+5:302020-04-27T18:56:45+5:30

सध्या बॉलिवूडचे सर्व सेलिब्रेटी घरात वेळ व्यतित करत आहेत आणि सोशल मीडियावर जुने फोटो शेअर करत आहेत.

अशात बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने 2008 सालच्या आठवणींना उजाळा देत फोटो शेअर केले आहेत.

12 वर्षे जुने हे फोटो कंगनाच्या युरोप ट्रीपचे आहेत.

सोशल मीडियावर कंगनाच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत.

या फोटोंमध्ये कंगनाने शानदार पोझ दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये कधी शॉर्ट्स तर कधी सूटबुटमध्ये कंगना पहायला मिळते आहे.

कंगनाने बॉलिवूडमध्ये गँगस्टर चित्रपटातून पदार्पण केले होते.

त्यानंतर कंगनाने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकानंतर एक चित्रपट करून तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.