अरे बापरे...! स्विमसूटमध्ये आशका गोराडियाचा योगा, हॉट फोटोज होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:36 PM2019-03-27T18:36:32+5:302019-03-27T18:41:50+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री व बिग बॉस फेम आशका गोराडिया नेहमीच सोशल मीडियावर फिटनेसमुळे चर्चेत असते. २०१७ साली आशका विदेशी बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत विवाहबंधनात अडकली. तेव्हापासून बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आशकाने नुकतेच स्विमिंग सूटवर योगा केला आहे. तिने स्विमसूटमधील हॉट व सेक्सी फोटो शेअर केले आहेत.

आशका एक मॉडेल व अभिनेत्री असून ती छोट्या पडद्यावरील कामामुळे खूप प्रसिद्ध आहे.

आशकाने आपल्या करियरची सुरूवात मालिका 'अचानक 37 साल'मधून केली.

एकता कपूरची प्रसिद्ध मालिका 'नागिन'मध्ये आशकाने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले आहे.

आशका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तसेच ती नच बलिये सीझन ८ची स्पर्धक होती.