Shakya Akhtar: फरहान अख्तरच्या लेकीची स्टाईल आहे सगळ्यात हटके, फोटोंनी इंटरनेटवर लावलीय आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:22 PM2022-09-01T13:22:38+5:302022-09-01T13:25:27+5:30

Farhan Akhtar's daughter Shakya Akhtar: बॉलिवूड स्टार्सची मुलं लाईमलाईटपासून दूर राहतात असं फार दिसत नाही. अनेक स्टार किड्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र काही स्टार किड्स मात्र लाईमलाईटपासून दूर राहतात. फरहान अख्तरची लेक त्यांच्यापैकीच एक आहे.

बॉलिवूड स्टार्सची मुलं लाईमलाईटपासून दूर राहतात असं फार दिसत नाही. अनेक स्टार किड्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र काही स्टार किड्स मात्र लाईमलाईटपासून दूर राहतात. फरहान अख्तरची लेक त्यांच्यापैकीच एक आहे.

फरहान अख्तरच्या मुलीचं नाव शाक्या अख्तर आहे. ती खूप स्टायलिश आहे. तसेच आपल्या हटके लुक्समुळे ती सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शाक्या कश्यप ही फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना अख्तर हिची लेक आहे. फरहानला अजून एक मुलगी आहे तिचं नाव अकीरा अख्तर असे आहे.

शाक्या अख्तरने हल्लीच तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा तिला शुभेच्छा देण्यासाठी फरहान अख्तरन इन्स्टाग्रामवर एक खास संदेश लिहिला होता.

शाक्या अख्तर ही लाईम लाईटपासून खूप लांब राहते. इतर स्टार किड्सप्रमाणे शाक्य अख्तरचे इन्स्टाग्रामवर फार फॅन फॉलोविंग नाही आहे. तिचे केवळ १३ हजार ५०० फॉलोअर्स आहेत.

तसेच शाक्या अख्तरचा फॅशन सेन्स हा इतर स्टार किड्सपेक्षा अगदी वेगळा आहे. ती पूर्णपणे हिप्पी किंवा जिप्सी स्टाईलमध्ये दिसते. केसांना वेगवेगळे रंग देणे तिला आवडते.