Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 02:21 PM2020-12-25T14:21:56+5:302020-12-25T14:42:33+5:30

ट्विटरवर मीम्सचा पूर... वरूण धवनची अशी घेतली मजा

वरूण धवन व सारा अली खानचा ‘कुली नंबर 1’ हा सिनेमा यावर्षीचा बहुप्रतिक्षीत सिनेमा होता. पण ओटीटीवर रिलीज झाला आणि या सिनेमाने प्रेक्षकांची पुरती निराशा केली.

सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आणि ट्विटरवर मीम्सचा पूर आला.

नेटक-यांनी अशा अशा शब्दांत ‘कुली नंबर 1’च्या या रिमेकची खिल्ली उडवली की, पाहताना हसू आवरणार नाही.

गोविंदाच्या एकेकाळी गाजलेल्या या सिनेमाचा इतका सुमार रिमेक बनवला गेला, हे पाहून अनेकांचा राग अनावर झाला.

गोविंदाने हा रिमेक पाहिल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल, यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

ख्रिसमस एन्जॉस करू इच्छित नसाल आणि डोके दुखायला हवे असेल तर ‘कुली नंबर 1’ पाहा, अशा प्रतिक्रिया नेटकºयांनी दिल्या.

वरूण धवनच्या अ‍ॅक्टिंगची नेटक-यांनी जोरदार खिल्ली उडवली. तुमसे ना हो पायेगा, म्हणत अनेकांनी त्याची मजा घेतली.

सोशल मीडियावरच्या या प्रतिक्रिया बघता वरूण धवनचा हा सिनेमा चाहत्यांच्या कसोटीवर खरा उतरू शकला नाही, हे स्पष्ट आहे.

1995 साली रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ने या गोविंदा व करिश्मा कपूरच्या सिनेमाने धूम केली होती. या चित्रपटाची गाणी तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. याच नावाने वरूण व साराला घेऊन याचा रिमेक बनवण्यात आला होता.

मसाला मुव्ही असल्याने हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज होईल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण अखेर अ‍ॅॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा रिलीज झाला.

या सिनेमात वरूण धवन, सारा अली खान यांच्याशिवाय परेश रावल, साहिल वैद, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, शिखा तलसानिया व जावेद जाफरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Read in English